थरारक : मुंबईतील स्टुडिओमध्ये मुलांना माथेफिरूने ओलिस ठेवले; स्टुडिओ जाळण्याची धमकी दिली ! अखेर आरोपीला पकडले

RA Studio building in Powai:RA Studio building in Powai:तो मानसिक रुग्ण असल्याचे बोलले जात आहे. त्या व्यक्तीने असे का केले हे समजू शकलेले नाही.

Mumbai Ra Studio Hostage

Mumbai Ra Studio Hostage

Children taken hostage in Mumbai’s RA Studio building in Powai: मुंबईतील पवई भागातील आर स्टुडिओमध्ये गुरुवारी दुपारी एक थरारक घटना घडली आहे. स्टुडिओमध्ये आलेल्या मुलांना कोंडून टाकण्यात आले. त्यानंतर स्टुडिओ जाळून टाकण्याची धमकी एका व्यक्तीने दिली होती. त्यामुळे खळबळ उडाली होती. शेवटी पोलिसांनी रोहित आर्या या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. तो मानसिक रुग्ण असल्याचे बोलले जात आहे. त्या व्यक्तीने असे का केले हे समजू शकलेले नाही. स्टुडिओमधून पंधरा वर्षाच्या सोळा ते सतरा मुलांची सुटका पोलिसांनी केलीय. ही सर्व मुले भेदरलेली आहेत. (Children taken hostage in Mumbai’s RA Studio building in Powai)


रोहित आर्याकडून व्हिडिओ
रोहित आर्याने एक व्हिडिओ व्हायरल केलाय. सुसाइट करण्यासाठी मी एक प्लॅन बनविला आहे. मी मुलांना ओलिस ठेवले आहे. माझ्या मागण्या कमी आहेत. माझे काही प्रश्न आहेत. मला काही लोकांना प्रश्न विचारायचे आहेत. त्यांचे काही उत्तर हवे आहेत. मी दहशतवादी नाही. माझी पैशांची मागणी नाही. मला काही संवाद साधायचा आहे. त्यासाठी मी मुलांना ओलीस ठेवले आहे. एका प्लॅन ठरविला होता. मी जिवंत राहिले तर मी करणार आहे. त्याचा संवादानुसार त्याला मुलांना जाळून टाकायचे होते.


रोहित आर्याकडून केमिकल, एअरगन जप्त

रोहित आर्याने स्टेडिओमधील एका रुममध्ये 17 मुलांना डांबले होते. स्टुडिओबाहेर गोंधळ उडाला होता. मुलांचे पालक बाहेर मुलांच्या सुटकेसाठी ओरडत होते. एका पोलिसांनी बाथरुममधून रुममध्ये घुसून मुलांची सुटका केली. तर रोहित आर्याला ताब्यात घेतले आहेत. त्याच्याकडे एअरगन आणि काही केमिकल आढळून आले आहे. याबाबत आता पोलिस चौकशी करत आहे. नेमकी हा प्रकार का घडला याचा शोध पोलिसांनी घ्यायचा आहे.

मुलांना आॅडिशन्ससाठी बोलविले अन्

रोहित आर्या हा पुण्यातील आहे. त्याने राज्यभरातील मुलांना ऑडिशन्ससाठी बोलविले होते. ऑडिशनला मुले आल्यानंतर दुपारी त्याने मुलांनी एका रुममध्ये डांबून ठेवले आणि एक व्हिडिओ व्हायरल केला होता. रोहित आर्याने काही वर्षांपूर्वी शाळेचे शासकीय काम घेतले होते. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या कालावधीतील हे काम होते. परंतु काही त्रुटी असल्याने त्याचे शासकीय बिल थकले होते. त्यामुळे रोहित आर्याने त्यांच्याविरोधात आंदोलन केले होते. परंतु आता त्याने टोकाचे पाऊल उचलून आपल्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय.

Exit mobile version