Download App

यंत्रणेमध्ये इतका गलथानपणा का आला? काँग्रेसची मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन मोठी मागणी

  • Written By: Last Updated:

मुंबई: राज्यातील सरकारी रुग्णालयात होत असलेल्या मृत्यूच्या संख्येवरून विरोधकांनी सरकारला घेरले आहे. नांदेड येथील शासकीय रुग्णालयातील मृत्यूनंतर विरोधक आणखी आक्रमक झाले आहेत. काँग्रेसचे (Congress) विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात (Balsaheb Thorat) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना एक पत्र लिहिले आहे. राज्याच्या आरोग्यव्यवस्थेची श्वेतपत्रिका काढण्याची मागणीच थोरातांनी केली आहे. त्याचबरोबर काही सवालही सरकारला थोरातांनी उपस्थित केले आहे.

नांदेडसह महाराष्ट्राच्या शासकीय रुग्णालयांमध्ये मृत्यूचे तांडव झाले. ही परिस्थिती नेमकी का उद्भवली? नेमके दोष कुठे होते? औषध पुरवठ्याची स्थिती काय होती? यंत्रणेमध्ये इतका गलथानपणा का आला? या प्रश्नांची खरी खरी उत्तरे महाराष्ट्राला हवी आहे. सरकारने आरोग्याची श्वेतपत्रिका काढून महाराष्ट्रासमोर सत्य मांडावे, अशी मागणी थोरातांनी केली आहे.


आमची बाजू ऐकल्याशिवाय निर्णय नको, अजित पवार गटाकडून सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल

बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपली भूमिका मांडली आहे. ते म्हणतात राज्याची संपूर्ण आरोग्यव्यवस्था सलाईनवर गेली आहे, आरोग्यमंत्री म्हणतात याला काही मी एकटा जबाबदार नाही, ही संपूर्ण मंत्रिमंडळाची जबाबदारी आहे. याचा अर्थ फक्त आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असा होत नाही तर संपूर्ण मंत्रिमंडळाची ही जबाबदारी आहे. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी थोरातांची आहे.

Chhagan Bhujbal : ‘चौकशी कसली करता मला माहित नाही’; दमानियांच्या आरोपांवर भुजबळांच स्पष्ट उत्तर

राज्यातील जी शासकीय रुग्णालये आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्रात फार मोठे काम केले आहे. गरीब माणसाला आधार देण्यात या रुग्णालयांचा मोठा वाटा आहे. आम्हाला आठवते, कोविडच्या कठीण काळात हीच यंत्रणा जीव तोडून काम करत होती, याच यंत्रणेने महाराष्ट्रातल्या अनेक गंभीर रुग्णांना वाचवले कारण तेव्हाच्या सरकारचा हेतू प्रामाणिक होता. महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला संकटातून बाहेर काढण्याची आमची भूमिका होती. असे असताना, या वर्षात काय घडले की, ज्यामुळे आरोग्य यंत्रणा अपयशी ठरत आहे, शोध घेतल्यानंतर लक्षात येते की या संपूर्ण देशाचे मूळ हे राज्य शासनाच्या कारभारात आहे. शासनाचा गलथानपणा आणि आरोग्य क्षेत्राकडे अक्षम्य दुर्लक्ष या काळात झाला असल्याचाही आरोप थोरातांनी केला आहे.

थोरात म्हणाले, खरेतर ही शासकीय रुग्णालये सामान्य माणसासाठी महत्त्वाचे असतात. सरकारने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. आर्थिक दृष्ट्या त्यांना पूर्ण पाठबळ दिले पाहिजे, त्यावर नियंत्रणही ठेवले पाहिजे. नांदेडसह महाराष्ट्राच्या रुग्णालयांमध्ये जे चित्र दिसते आहे ते विदारक आहे. दोन दोन दिवसात शेकडो लोकांना जीव गमवावा लागतो, ही जबाबदारी शासनाचीच आहे. शासनाला त्यापासून पळ काढता येणार नाही.

शासकीय रुग्णालये ही गरिबांसाठी असतात, ज्यांची रुग्णांची आर्थिक स्थिती खाजगी रुग्णालयांचा खर्च पेलण्यासारखी नसते असेच रुग्ण शासकीय रुग्णालयांमध्ये येतात. परंतु त्यांच्यावर उपचार होण्याऐवजी त्यांना मृत्यूच्या खाईत लोटण्याचे प्रकार होत असतील आणि दुसरीकडे ‘शासन आपल्या दारी’ व विविध आरोग्य योजनांच्या जाहिराती देऊन शासन स्वत:ची पाठ थोपटून घेत असेल तर ते दुर्दैवी असल्याचे थोरात यांनी म्हटले आहे.

Tags

follow us