Download App

लोकसभा निवडणुकीपूर्वीही हमास संघटनेच्या निमित्ताने मोदी पाकिस्तानशी…; कुमार केतकरांचा मोठा दावा

  • Written By: Last Updated:

Kumar Ketkar On PM Modi : देशात आजवर मोठ्या प्रमाणात नरसंहार झाला. ग्रोधा हत्याकांड (Grodha massacre) ही घटना तर अंगावर शहारा आणणारी होती. दरम्यान, गोध्रा हत्याकांड, पुलवामा हल्ला या घटनांचा उल्लेख करत कॉंग्रेस खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर (Kumar Ketkar) यांनी मोठा दावा केला आहे. 2002 साली गोध्रा दुर्घटना ते 2019 चा पुलवामा हल्ला या दरम्यान प्रत्येक लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात मोठी दुर्घटना घडली आहे. हा निव्वळ योगायोग नाही. त्यामुळं आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीही पॅलेस्टिनच्या हमास दहशतवादी संघटनेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पाकिस्तानशी कुरापत काढू शकतात, असा खळबळजनक दावा केतकर यांनी केला.

मराठा समाजासाठी योगदान काय ते एकदा जाहीर करा? विखेंचे थेट शरद पवारांना ‘चॅलेंज’ 

आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पद्मश्री दया पवार फाउंडेशनच्या पुरस्कार वितरण समारंभात केतकर बोलत होते. यावेळी भाषातज्ज्ञ गणेश देवी आणि गुजरात काँग्रेसचे आमदार जिग्नेश मेवाणी, लेखक लेखक राजू बाविस्कर हे हजर होते. या कार्यक्रमात मेवानी यांनी दया पवार पुरस्कार, तर बावीसक्रा यांनी बलुतं पुरस्काराने गौरवण्यात आलं.

यावेळी बोलतांना केतकर म्हणाले, कवी नामदेव ढसाळ यांनी साम्यवाद आणि गांधीवाद एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. त्याचे प्रॉडक्ट म्हणजे दया पवार होते. जोपर्यंत दलित चळवळ जीवन-मरणाचे प्रश्‍न मांडत नाही, तोपर्यंत आंबेडकरी उत्सव निरर्थक आहे. देशात जे काही चालले आहे, त्याने चळवळींनी अंत:र्मुख व्हायला हवं. अंत:र्मुख झालो, तरच बंड होते, असं केतकर म्हणाले.

ते म्हणाले, 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीही पॅलेस्टिनच्या हमास दहशतवादी संघटनेच्या निमित्ताने मोदी पाकिस्तानशी कुरापत काढू शकतात. 2024 च्या निवडणुकीत सत्ताबदल झाला तरी घटनात्मक संस्थांमध्ये संघ परिवारातील लोक असतील. सत्ता तुमची असेल पण देश त्यांच्या ताब्यात असेल. त्यामुळे संघर्षाची तयारी ठेवावी लागेल, असं केतकर म्हणाले.

यावेळी बोलतांना जिग्नेश मेवानी म्हणाले की, सध्याचं भोवतालचं वातावरण भयंकर आहे. लोकांचा आवाज दाबल्या जातोय. त्यामुळं सध्याच्या राजकीय परिस्थिती क्रांती करण्यासाठी लोकांना सज्ज व्हायला हवं. जर प्रस्तापित सत्ता संविधान बदलण्याची भाषा करत असेल तर निश्चितच या सत्तेला बाजूला करणं गरजेचं आहे. जनतेनं आगामी निवडणुकींमध्ये बदल घडवला पाहिजे, असं मेवाणी म्हणाले.

यावेळी गणेश देवी म्हणाले, बुलतेदारांचे राज्य जगभर निर्माण झालं पाहिजे आणि त्यासाठी त्यांच्याविरोधात प्रसवले जाणारे कमी करणं गरजेचं आहे.

आगामी लोकसभा निडणुकीपूर्वी देशात भाजप दंगली घडवेल, असे आरोप विरोधक करत असतात. तर आता कुमार केतकर यांनी मोदी पाकिस्तानशी कुरापती काढतील, असं वक्यव्य केलं. त्यामुळं देशात पुन्हा एखादी मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.

follow us