Sanjay Nirupam on Uddhav Thackeray : महाविकास आघाडीमध्ये उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघावरुन (Mumbai North West Lok Sabha Constituency) डोकेदुखी वाढली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अमोल कीर्तीकर (Amol Kirtikar) यांना या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र या उमेदवारीला काँग्रेस नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी विरोध केला आहे. उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका करत त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना यामध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
अमोल कीर्तीकर यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेत त्यांनी म्हटले की काल संध्याकाळी उरलेल्या शिवसेना प्रमुखांनी अंधेरी येथील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार घोषित केला. रात्रीपासून फोन येत आहेत. हे कसे होऊ शकते? महाविकास आघाडीच्या दोन डझन बैठका होऊनही जागावाटपाचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही.
पळवाट म्हणून शरद पवारांनी शेळकेंना टार्गेट केलं; अजित पवारांचे सडतोड टीका
ही जागाही अनिर्णयीत असलेल्या 8-9 जागांपैकी एक आहे, असे मला जागा वाटप बैठकीमध्ये सहभागी झालेल्या काँग्रेसच्या सहकाऱ्यांनी सांगितले आहे. मग शिवसेनेचा उमेदवार जाहीर करणे हे युती धर्माचे उल्लंघन नाही का? असा सवाल त्यांनी केला आहे.
काँग्रेसचा अपमान करण्यासाठी असे कृत्य जाणीवपूर्वक केले जात आहे? यामध्ये काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाने हस्तक्षेप करावा. शिवसेनेने जाहीर केलेला उमेदवार कोण आहे? तो खिचडी घोटाळ्यातील घोटाळेबाज असून त्याने खिचडी पुरवठादाराकडून चेकने लाच घेतली आहे, असा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे.
‘…तर मी तुमच्यासोबत नसेल’, भास्कर जाधव ठाकरेंची साथ सोडणार का?
त्यांनी पुढं म्हटले की खिचडी घोटाळा काय आहे? कोविडच्या काळात बीएमसीद्वारे स्थलांतरित मजुरांना मोफत अन्न पुरवण्याचा एक स्तुत्य कार्यक्रम होता. शिवसेनेच्या प्रस्तावित उमेदवाराने गरिबांना जेवण देण्याच्या योजनेतून कमिशन घेतले आहे.
ईडी संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे. काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते अशा घोटाळेबाज उमेदवाराचा प्रचार करतील का? दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाला माझा हा प्रश्न आहे? असे संजय निरुपम यांनी म्हटले आहे.
जागावाटपाचं घोंगड भिजत तरी युती-आघाडीचे मुंबईतील उमेदवार जाहीर, यांना मिळणार संधी!