Sameer Wankhede : कार्डिलिया क्रूझ प्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या प्रकरणात समीर वानखेडेंना मुंबई हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. वानखेडेंना अटकेपासून 15 फेब्रुवारीपासून संरक्षण मिळालं आहे. या प्रकरणात समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) याच्याकडून खंडणी मागितल्याचा आरोप सीबीआयने केला होता. सीबीआयने (CBI) जो गुन्हा दाखल केला आहे तो रद्द करण्यात यावा आणि अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी समीर वानखेडे यांनी उच्च न्यायालयात (Mumbai High Court) याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. या सुनावणीत हायकोर्टाने वानखेडेंना 15 फेब्रुवारीपर्यंत दिलासा दिला आहे.
कार्डेलिया क्रूजवर छापा टाकला गेला त्यावेळी समीर वानखेडे मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) मध्ये झोनल डायरेक्टर या पदावर कार्यरत होते. यावेळी आर्यन खान याला ड्रग्स प्रकरणातून मुक्त करण्यासाठी 25 कोटी रुपयांची लाच शाहरुख खानकडे मागितल्याचा आरोप समीर वानखेडे यांच्यासह आणखी चार जणांवर ठेवण्यात आला होता.
समीर वानखेडे हे NCB च्या मुंबई विभागीय संचालक पदावर असताना त्यांच्या पथकाने ऑक्टोबर 2021 मध्ये मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका क्रूझ जहाजावर छापा टाकला होता. या कारवाईत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेण्यात आले. कॉर्डेलिया क्रूज शिपवर रेव्ह पार्टी सुरू असताना तिथं अंमली पदार्थ असल्याची माहिती वानखेडेंच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून त्यांनी या शिपवर धाड टाकली होती.
छाप्यानंतर अनेक मुलं-मुली अंमली पदार्थांचे सेवन करताना आढळून आले होते. यामध्ये आर्यन खानही होता. एनसीबीच्या पथकाकडून पुढे आर्यन खानवर कारवाई करण्यात आली. काही दिवस त्यांना तुरुंगाची हवा खावी लागली होती. ड्रग्ज प्रकरणात केलेली ही अटक देशभरात गाजली होती. आर्यन खानला एसआयटीच्या तपासानंतर एनसीबीनं क्लीनचिट दिली होती.
कॅटनेही दिला होता दिलासा
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अंमली पदार्थ प्रकरणी एनसीबीचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर लाच घेतल्याचा आरोप होता. मात्र, चौकशीत समीर वानखेडेंवरील आरोप खोटे असून ते निर्दोष असल्याचे कॅटने (केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण) म्हटलं होते. त्यामुळे वानखेडे यांना मोठा दिलासा मिळाला होता.
Jawan मधील व्हायरल डायलॉगनंतर समीर वानखेडेंनी किंग खानला दिलं उत्तर? म्हणाले..