Jawan मधील व्हायरल डायलॉगनंतर समीर वानखेडेंनी किंग खानला दिलं उत्तर? म्हणाला…
Sameer Wankhede Post: किंग खानच्या (Shah Rukh Khan) बहुचर्चित ‘जवान’ सिनेमाचा ट्रेलर नुकताच चाहत्यांच्या भेटीला आला. ‘जवान’ सिनेमा पुढच्या आठवड्यात ७ सप्टेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात येणार आहे. (Social media) सुमारे साडेतीन मिनिटांच्या व्हिडिओत किंग खानचे अनेक संवाद चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या ट्रेलरमधील अशाच एका डायलॉगची (dialogue) सध्या सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. या डायलॉगचं कनेक्शन चाहते थेट समीर वानखेडेंशी (Sameer Wankhede) जोडत असल्याचे बघायला मिळत आहेत.
I have licked the fire and danced in the ashes of every bridge I ever burned. I fear no hell
from you.
-Nicole Lyons
A quote that always inspires me !@ABPNews @news24tvchannel @RoflGandhi_— Sameer Wankhede (@swankhede_IRS) August 31, 2023
‘जवान’च्या ट्रेलरमधील एका सीनमध्ये किंग खान ‘मुलाला हात लावण्याअगोदर बापाशी बोल’ असं म्हणत असल्याचे बघायला मिळत आहे. यावर असंख्य चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच या डायलॉगची स्वतंत्र १२ सेकंदाची क्लिप सुद्धा सध्या सोशल मीडियावर (Social media) जोरदार व्हायरल होत आहे. काही चाहत्यांनी याचा संदर्भ थेट समीर वानखेडे यांच्याशी जोडला होता.
या पार्श्वभूमीवर आता स्वत: समीर वानखेडेंनी ट्विटरवर पोस्ट (Twitter Post ) शेअर करत किंग खाणच नाव न घेता त्याला थेट उत्तर दिलं आहे. समीर वानखेडेंनी ट्विटरवर निकोल लायन्स यांचा कोट शेअर केला आहे. “आयुष्यामध्ये अनेक कठीण प्रसंगांचा सामना केल्याने मला कोणतीही भीती वाटत नाही.” असा या कोटचा अन्वयार्थ आहे. ही पोस्ट वानखेडे यांनी किंग खानच्या व्हायरल होणाऱ्या डायलॉगमुळे शेअर केली आहे असा अंदाज अनेकांनी लावला आहे.
समीर वानखेडेंनी ट्वीटमध्ये कोणाचेही नाव घेतले नाही. त्यांनी केवळ कोट शेअर करत काही वृत्तवाहिन्यांना टॅग केल्याचे बघायला मिळत आहे. दरम्यान, समीर वानखेडे यांनी किंग खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. त्यावेळी किंग खानच्या ‘जवान’ सिनेमाचं शूटिंग सुरु होतं. याप्रकरणी आर्यन खान हा जवळपास महिनाभर तुरुंगात होता. पुढे आर्यनला ड्रग्ज प्रकरणात क्लीन चिट दिली होती.