Download App

BMC Covid Scam मध्ये लाच म्हणून वाटली सोन्याची बिस्कटं; ईडीच्या आरोपपत्रात धक्कादायक माहिती

  • Written By: Last Updated:

BMC Covid Scam : मुंबई महापालिकेतील (Mumbai Municipal Corporation) कथित कोविड घोटाळ्यासंदर्भात (covid scam) आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) कोविड घोटाळ्याबाबत आरोपपत्र दाखल केले आहे. त्यानुसार घोटाळ्याच्या पैशातून सोन्याची बिस्किटे खरेदी करण्यात आली. ही बिस्किटं लाचेच्या स्वरुपात मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांना दिली, असा दावा ईडीच्या आरोपपत्रात केला आहे. त्यामुळं हे अधिकारी व राजकारणी कोण, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

कोविड घोटळ्याप्रकरणी ईडीनं सुजित पाटकर यांच्यासह हेमंत गुप्ता, संजय शहा आणि राजीव साळुंखे यांच्याविरुद्ध १५ सप्टेंबर रोजी आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात मुंबई महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. किशोर बिसुरे, डॉ. अरविंद सिंग, दहिसर जंबो कोविड सेंटरचे डीन यांचाही समावेश आहे.

“करदात्यांच्या पैशावर मंत्र्यांची मजा” : आदित्य ठाकरेंनी काढला शिंदे सरकारच्या परदेश दौऱ्यांचा सातबारा 

ई़डीच्या आरोपत्रानुार, लाईफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसला 2020 मध्ये, दहिसर आणि वरळी जंबो कोविड सेंटरला वैद्यकीय सेवा पुरविण्याचे कंत्राट देण्यात आले होते. लाईफलाइनचे पार्टनर संजय शाह यांनी सोन्याची बिस्किटे, बार आणि नाणी खरेदी केली. ती सुजित पाटकर यांच्यामार्फत बीएमसीचे अधिकारी आणि अन्य व्यक्तींनी लाचेच्या स्वरपात वाटली, असा आरोप आहे. तसंच सुजित पाटकरानी 15 लाख रुपयांची रक्कम महापालिका कर्मचाऱ्यांना दिली. या वस्तूंच्या बदल्यात हे अधिकारी व व्यक्ती जंबो कोविड सेंटरमधील कर्मचाऱ्यांच्या संख्येकडे दुर्लक्ष करतील, असा व्होरा होता.

जुलै ते डिसेंबर 2020 दरम्यान दहिसर कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या डॉ. किशोर बिसुरे यांना लॅपटॉपसह 20 लाख रुपयांची रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू मिळाल्याचेही ईडीनं आरोपपत्रात सांगितलं आहे.

लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीनं खोटी कागदपत्र सादर करून कंत्राट मिळवलं. कंत्राट मिळाल्यानंतर योग्य मनुष्यबळ न पुरवता कोरोना रुग्णांचा जीव धोक्यात घातला. कंपनीनं गैरमार्गारनं 21.07 कोटी रुपये बेकायदेशीरपणे कमावल्याचेही ईडीने आरोपपत्रात म्हटले आहे.

गुन्ह्यातील रक्कम लाईफलाइनच्या बँक खात्यांमधून आरोपी भागीदार आणि इतर आरोपींच्या बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यात आली. त्यानंतर ती रक्कम त्यांनी आपल्या वैयक्तिक खर्चासाठी वापरली, असेही ईडीने आपल्या आरोपपत्रात नमूद केले आहे.

उल्लेखनीय बाब ही की, सुजित पाटकर हे लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे प्रमुख भागीदार आहेत. या फर्ममध्ये त्यांनी केवळ 12500 रुपये गुंतवले होते. पाटकर यांची या कंपनीत 30 टक्के भागीदारी असल्याचेही ईडीने आरोपपत्रात म्हटले आहे.

Tags

follow us