Care Taker Killed Senior Citizen In Mumbai Area : मुंबईतील सांताक्रूझमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. येथे एका 85 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची केअर टेकरने हत्या केल्याचे समोर आले आहे. मुरलीधर पुरूषोत्तम नाईक असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून, ते त्यांची पत्नी आणि केअरटेकरसोबत वास्तव्यास होते.
Maharashtra | An 85-year-old man named Muralidhar Purushottam Naik was killed by his caretaker in Mumbai's Santacruz area. The caretaker Krishna Manbahadur later fled from the spot. Santacruz police registered a case under IPC section 302 and started further investigation: Mumbai…
— ANI (@ANI) May 8, 2023
Video : माजी पंतप्रधान देवेगौडांशी नाथाभाऊंचं सख्य जुळलं कसं?
ज्यावेळी पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली त्यावेळी त्यांना घटनास्थळी धाव घेतली असता, नाईक यांचा मृतदेह घरात आढळून आला. प्राथमिक माहितीनुसार संबंधित व्यक्तीची हत्या हातपाय बांधून गळा आवळून केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Sharad Pawar मोठे नेते पण… वारसदार निर्माण करण्यात अपयशी, सामनातून परखड टीका
दरम्यान, नेमकी ही हत्या कोणत्या कारणामुळे झाली याचे कोणतेही कारण अद्याप समोर आलेले नाही. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, कृष्णा मानबहादूर ही व्यक्ती नाईक यांच्या घरी कामाला होती. ज्या ठिकाणी ही घटना घडली आहे ती सोसायची उच्चभ्रू असल्याचेही समोर आले आहे. घटनेनंतर कृष्णा मानबहादूर याने पळ काढला आहे.
boat Accident : केरळमध्ये भयावह दुर्घटना, पर्यटकांची नाव उलटून 21 जणांचा मृत्यू
ज्येष्ठांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
आज मुंबई किंवा पुण्यासारखा शहरांमध्ये अनेक वृद्ध एकटे राहत आहेत. अनेकांची मुले दिवसभर कामाला जात असल्याने किंवा काही मुले नोकरीसाठी परदेशात आहेत. आपल्या अपरोक्ष अनेक मुले पालकांची काळजी घेण्यासाठी केअर टेकरची नेमणूक करतात. मात्र, सांताक्रूजमध्ये घडलेल्या या घटनेमुळे पुन्हा एकदा एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहेअसून, घरातील ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्यासाठी केअर टेकरची संपूर्ण शहानिशा करून तसेच त्या व्यक्तीबाबत पोलिसांना माहिती देणे यामुळे गरजेचे झाले आहे.
Video : माजी पंतप्रधान देवेगौडांशी नाथाभाऊंचं सख्य जुळलं कसं?