Download App

Ajit Pawar : सरकारची धुळवड झाली असेल तर शेतकऱ्यांना मदत करावी

मुंबई : राज्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांच मोठं नुकसान झाले आहे. आंबा, हरभरा, गहू, कांदा, संत्रा, मका, ज्वारी, भाजीपाला, द्राक्ष या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे. अशी मागणी विरोधी पक्षाच्या वतीने अधिवेशनात (Budget session) केली जाईल, असे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले.

6 मार्च ते 9 मार्च दरम्यान राज्यातील काही भागातील हवामान बदलले जाईल असं हवामान विभागाने सांगितले होते. त्या बदलामुळे अवकाळी पाऊस आणि गारपीट होईल असं सांगितले होते. नेमकं महाराष्ट्रात ते घडलं आहे. शेतकऱ्यांवर वाईट परिस्थिती आली आहे. त्यांच्या काही क्लिप सोशल मीडियावर फिरत आहेत. पीक वादळाने पडलं आहे आणि शेतकरी त्यावर झोपला आहे. तो स्वत:लाच मारून घेत आहे, असे अजित पवार म्हणाले.

अहमदनगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष आज ठरणार

शेतकऱ्यांचे किती नुकसान झाले आहे याचा सरकारला अजून अंदाज आलेला नाही. कारण काल धुलिवंदन होत आणि आदल्या दिवशी होळी असल्याने बरेच नेते त्यामध्ये गुंतलेले होते. पण त्याच वेळी शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाने वाईट वेळ आली आहे. त्यामुळे त्यांना मदत मिळणे गरजेचे आहे, अशी मागणी अजित पवार यांनी केली.

महिला दिनाच्या निमित्ताने एक खंत वाटते की एवढा मोठा महाराष्ट्र आणि त्या महाराष्ट्रात जागतिक महिला दिनाच्या (International Womens Day) दिवशी एक देखील महिला मंत्री नाही. हे कमीपणाचे वाटते. महाराष्ट्र सरकारला ते शोभत नाही. मी अनेकदा जाहीर सभातून आणि सभागृहात मागणी केली आहे. पण सरकारला कोणती अडचण आहे हे कळत नाही, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे.

follow us