Download App

Video : “शेतकऱ्यांच्या आडून राजकारण करू नका, गोंधळ घालू नका”, अजितदादांनी विरोधकांना खडसावलं

विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या आडून राजकारण करू नये, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.

Ajit Pawar Angry on Opposition Parties : शेतकरी हा लाखोंचा पोशिंदा आहे आणि राज्यातलं सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, अडचणी समजून घेऊन त्या सोडवणं, शेतकऱ्यांना मदत करणं सरकारची जबाबदारी असून आमचं सरकार ती पार पाडेलंच. शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्यास सरकार तयार आहे. मात्र, विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या आडून राजकारण करू नये, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभागृहात गोंधळ घालू नये असेही अजित पवार म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभेत म्हणाले की, विरोधी पक्ष सदस्यांनी सभागृहात गोंधळ घालू नये. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. सरकारकडे सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. सरकार चर्चेपासून पळ काढणार नाही हे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. विरोधी पक्षांना त्यांच्या उद्याच्या ठरावात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची संधी आहे.

मराठी-हिंदी भाषा वादात राज ठाकरेंच्या नातवाची एन्ट्री; दादांच्या आमदारानं नवी वात पेटवली….

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या अडचणींची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. कोणतीही अडचण असो सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहे आणि राहणार आहे. आम्ही केवळ बोलत नाही तर प्रत्यक्ष कृतीवर विश्वास ठेवतो. शेती ही आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हित साधणे, त्यांचे प्रश्न सोडवणे हे सरकारच्या धोरणात सर्वोच्च प्राधान्याने आहे. कोणत्याही परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांना एकटे पडू देणार नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील बळीराजाच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे असल्याचा पुनरुच्चार केला.

follow us