Download App

उद्घाटन फडणवीसांच्या दालनाचं मात्र, नारळ वाढवला एकनाथ शिंदेंनी

Devendra Fadanvis New Office : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. यंदाचे अधिवेशन वेगळ्या अर्थाने महत्वाचे ठरणार आहे. याचे कारण उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आपल्या सहकाऱ्यांसह सत्ताधारी बाकांवर दिसणार आहेत. गेल्यावर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडानंतर वर्षभरातच अजित पवारांनी केलेल्या बंडाने अधिवेशनाचे चित्रच बदलून गेले आहे. त्यापार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नवीन दालनाचे उद्घाटन आज झाले. ( Devendra Fadanvis and Eknath Shinde )

पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानभवनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना नवीन दालन देण्यात आले. विशेष म्हणजे या नवीन दालनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते करण्यात आले. एकनाथ शिंदेंनी नारळ वाढवून फडणवीसांच्या कार्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे देखील उपस्थित होते.

विधानसभेत ऐतिहासिक क्षण! विरोधी पक्ष नेत्याची खुर्ची रिकामी तर माजी सहा चेहरे सत्ताधारी बाकावर

यावेळी भाजप व शिवसेनेचे इतर आमदारही उपस्थित होते. भाजपचे मंत्री गिरीश महाजन, अतुल सावे, चंद्रकांत पाटील, आमदार श्वेता महाले आदी नेते उपस्थित होते. तर शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, संजय राठोड, आमदार भरत गोगावले ही नेतेमंडळी उपस्थित होती.

यानंतर उपस्थित नेतेमंडळींमध्ये हास्यविनोद झाल्याचे फोटोवरुन दिसून येते आहे. मंत्री शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, गिरीश महाजन हे सर्व जण हसताना दिसून येत आहे. त्यामुळे नक्कीच काही तरी विनोद झाला असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

चित्रपट सृष्टीच्या अडचणींची यादी घेऊन सुशांत शेलार पोहचला मुख्यमंत्र्याच्या भेटीला

दरम्यान, यावेळी अजित पवार गटाचे कोणीही उपस्थित नव्हते. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमची भावनिक युती असून 25 वर्षांपासून आम्ही एकत्र आहोत, असे म्हटले होते. त्यानुसार याठिकाणी शिंदे-फडणवीस एकत्र असल्याचे दिसून आले.  तसेच फडणवीसांनी बोलताना राष्ट्रवादीसोबत आमची राजकीय मैत्रीअसून पुढच्या 10 ते 15 वर्षांमध्ये ती देखील भावनिक युती होईल, असे म्हटले होते.

Tags

follow us