Devendra Fadnavis :राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Elections) आता दोन महिन्यांपेक्षाही कमी दिवस शिल्लक राहिले आहेत. लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) महाविकास आघाडी अभेद्य राहिली. विधानसभेतही हाच प्रयोग राबविण्यासाठी आघाडीचे नेते प्रयत्न करत असून यात त्यांना यश येताना दिसत आहे. महायुतीने कंबर कसली आहे. युतीतील सर्वात मोठा पक्ष भाजपने वेगळी रणनीती आखली आहे. देवेंद्र फडणवीस आमदारांच्या (Devendra Fadnavis) विभागवार बैठका घेत आहेत. नुकतीच त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी आमदारांना महत्वाच्या सूचना दिल्या. तसेच जिंकून येणाऱ्या आमदारालाच तिकीट असे या बैठकीत सांगण्यात आले. त्यामुळे आमदार आणि इच्छुकांत धाकधूक वाढली आहे.
महायुतीत ट्विस्ट! निवडणुकीआधीच वेगळ्या वाटा, आज ‘या’ नेत्याकडून नव्या आघाडीची घोषणा?
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीत जागावाटपाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मतदारसंघांची चाचपणी केली जात आहे. काल देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात महत्वाची बैठक झाली. या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. महायुती एकत्रित लढण्याचा निर्णय घेण्यात आला. विरोधकांचा फेक नरेटिव्ह खोडून काढण्यासह प्रभावी प्रचाराची रणनीती ठरवण्यात आली.
या बैठकीव्यतिरिक्त महायुतीतील प्रमुख नेते आपापल्या पक्षांच्या स्वतंत्र बैठकाही घेत आहेत. देवेंद्र फडणवीस सध्या विभागवार बैठका घेत आहेत. काल त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांची बैठक घेतली. त्यांची मते जाणून घेतली. निवडणुकीबाबत त्यांना महत्वाच्या सूचना दिल्या. प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यास मी स्वतः मदत करील अशी ग्वाही फडणवीसांनी दिली.
महायुती सरकारच्या ज्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांची मदत घ्या. जिंकून येणाऱ्या आमदारालाच तिकीट देणार असल्याचे वक्तव्य फडणवीस यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर आमदार आणि इच्छुकांत धाकधूक वाढली आहे. आता भाजप श्रेष्ठी जिंकून येणाऱ्या आमदारासाठी कोणते निकष लावणार, फडणवीस म्हणाले त्या प्रमाणेच होणार का असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.
फडणवीसांकडे सगळे भुरटे चोर.. मनोज जरांगेंची सदाभाऊ खोतांवर तुफान फटकेबाजी
निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन महायुतीने नियोजन सुरू केले आहे. राज्यभरात समन्वय मेळावे आणि संवाद दौरे सुरू होणार आहेत. येत्या 20 ऑगस्टपासून राज्यातील सातही विभागात मेळावे आणि दौरे सुरू होणार आहेत. या कार्यक्रमांना महायुतीचे नेतेही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत राज्याचं राजकीय वातावरण चांगलच ढवळून निघणार आहे.