Elvish Yadav : बिग बॉस ओटीटी 2 विजेता एल्विश यादववर (Elvish Yadav) रेव्ह पार्ट्या आयोजित करण्याबरोबरच नशेसाठी विषारी सापांचे विषाचा वापराबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचे राज्याच्या राजकारणात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. काँग्रेसनंतर आता ठाकरे गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यांच्या या टीकेनंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्र्यांच्या बचावासाठी पुढे आले आहेत. फडणवीस यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एल्विश यादव प्रकरणात विरोधी पक्षांकडून मुख्यमंत्र्यांवर होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. पत्रकारांनी त्यांना याच मुद्द्यावर प्रश्न विचारला.
Noida Rave Case: ‘ड्रग्जमाफियाची सूत्र मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात’, राऊतांचा गंभीर आरोप
हे ‘उबाठा’च्या वैफल्यग्रस्त लोकांचे धंदे
मुख्यमंत्र्यांकडे जेव्हा गणेशोत्सव असतो त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारचे सेलेब्रिटी मंडळी येत असतात. आता त्यावेळी एल्विश यादव हा रियालिटी शो जिंकलेला होता त्यावेळी तो सेलिब्रिटी होता. असे अनेक सेलिब्रिटी त्या ठिकाणी येऊन जातात. ज्यावेळेस तो येऊन गेला त्यावेळेस त्याच्यावर कोणताही आरोप झालेला नव्हता. तो त्यावेळी एक सेलिब्रिटी म्हणून येऊन गेला होता. आता त्याच्यावर आरोप आहेत त्याचा जर हिशोब करायला लागलो तर मग राज्यातल्या अनेक पुढाऱ्यांना अडचणी होतील. काही वाटलं की करा मुख्यमंत्र्यांवर आरोप हे जे काही धंदे चाललेले आहेत. हे जे वैफल्यग्रस्त उबाठाचे लोकं आहेत हे अशा प्रकारचे धंदे करतात, अशा शब्दांत फडणवीस यांनी ठाकरे गटावर पलटवार केला.
गणेशोत्सवात एल्विश सीएम शिंदेंच्या घरी
नुकताच देशासह राज्यात मोठ्या आंनंदात गणपती उत्सव साजरा करण्यात आला. या काळात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा निवास्थानी राजकीय नेत्यांसह अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यात प्रामुख्याने शहनाज गिल, रश्मी देसाई यांच्यासह बॉलिवूडमधील स्टार्सनी हजेरी लावली होती. यात ‘बिग बॉस OTT 2’ चा विजेता एल्विश यादवनेदेखील हजेरी लावत आरती करत शिंदेंच्या गणपतीचे आशीर्वाद घेतले होते. त्यानंतर आज एल्वीशवर दिल्लीतील नोयडामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, हीच संधी साधत काँग्रेसने ट्विट करत एकनाथ शिंदेंना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
आता नोएडा पोलिसांनी विषारी रेव्ह पार्टी आयोजित केल्याप्रकरणी एल्वीस यादव व त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा नोंद केला असून त्यांच्याकडे जिवंत विषारी साप सापडले आहेत. यापूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पुण्यातील कुख्यात गुंड बाबा बोडकेंचे वर्षा बंगल्यावरील फोटो आल्याची आठवणही या ट्विटमध्ये लोंढे यांनी करून देत अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? असा सवाल केला आहे.
Elvish Yadav : एल्वीश यादववर गुन्हा दखल होताच अतुल लोंढेंना आठवला CM शिंदेंचा गणपती उत्सव