Noida Rave Case: ‘ड्रग्जमाफियाची सूत्र मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात’, राऊतांचा गंभीर आरोप

Noida Rave Case: ‘ड्रग्जमाफियाची सूत्र मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात’, राऊतांचा गंभीर आरोप

Sanjay Raut On CM Eknath Shinde: या महाराष्ट्रात अमली पदार्थांचा व्यापार वाढला आहे. बिग बॉस 2 चा विजेता एल्विश यादवच्या (Elvish yadav) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. (Noida Police) त्यानं नोएडातील एका रेव्ह पार्टीमध्ये सापाचं विष आणि विदेशी तरुणींचा पुरवठा केल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे. या महाराष्ट्रात अमली पदार्थांचा व्यापार वाढलेला आहे. याचे उत्तर देशाचे गृहमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री यांना द्यावं लागेल, अशी टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे.

रेव्ह पार्टीमध्ये (Noida Rave Case) सापाचं विष पासून तयार होणार अमली पदार्थ सेवन करणारे वर्षावर पोहोचतात आणि त्यांचं नाव तुम्हाला माहित आहे. पण मुख्यमंत्र्यांना माहित नाही. त्यांना एक खासदार मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जातो. (CM Eknath Shinde) त्यांना मिठ्या मारल्या जातात आणि त्यांच्या हातून गणपतीची आरती केली जाते. मुख्यमंत्री त्यांच्या बाजूला उभे राहतात. देशात जे खतरनाक अमली पदार्थाचा व्यापार चालवतात. त्याची सूत्र मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात आहेत का? याचा शोध घेण्याची गरज आहे. अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी शिंदे गटावर केले आहे.

Maratha Reservation : कुणबी नोंदी राज्यभर शोधणार, सरकार अॅक्शन मोडवर

काही दिवसांपूर्वी गणेशोत्सवादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी आरती करताना दिसला होता. त्यावरून आता विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना व सरकारला लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. यासंदर्भात संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत याला कोणी पोहोचविले? मुख्यमंत्र्यांच्या टोळीतील हे खासदार कोण आहेत? त्याचे काय आर्थिक संबंध आहेत? मुख्यमंत्र्यांच्या टोळीत कोणाशी आहे का? असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.

दिल्लीत मुख्यमंत्र्यांच्या राजकीय कुटुंबातले किती आमदार ड्रग्जचं सेवन करतात याची माहिती हवी असेल तर मी देईन”, असा गंभीर आरोप संजय राऊतांनी यावेळी केला.’ही सगळी नौटंकी आहे. ईडीच्या कार्यवाही टाळण्यासाठी तुम्ही सरकार स्थापन केलात. सगळ्यात मोठी नौटंकी अजित पवार गट करत आहे, असा जोरदार हल्लाबोल संजय राऊतांनी यांनी अजित पवार यांच्यावर केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube