धक्कादायक! मंत्रालयाच्या पाण्याच्या टाकीत मेलेले मांजर, कर्मचाऱ्यांना आठवड्यापासून उलटी आणि जुलाब

Dead cat in water tank at Mantralaya थेट मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत मेलेले मांजर आढळून आल्याने खळबळ माजली आहे.

Dead Cat In Water Tank At Mantralaya 2

Dead Cat In Water Tank At Mantralaya 2

Dead cat in drinking water tank at Mantralaya, employees vomiting and suffering from diarrhea for week : अनेकदा शाळांमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी दूषित पाण्याने लोक आजारी पडल्याच्या घटना ऐकू येतात. मात्र आता थेट मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत मेलेले मांजर आढळून आल्याने खळबळ माजली आहे. दरम्यान यामुळे गेल्या आठवड्याभरापासून मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना उलटी आणि जुलाबचा त्रास होत आहे.

नेमकं प्रकरण काय?

गेल्या आठवड्याभरापासून मंत्रालयातील कर्मचारी हे दूषित पाण्यामुळे आजारी पडत आहेत.मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना उलटी आणि जुलाब चा त्रास होत आहे. मंत्रालयातील पाण्याच्या टाकीत मांजर मरून पडल्यामुळे टाकीतील पाणी हे दूषित झाले होते. त्यामुळे मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना गेल्या आठवड्या भरापासून त्रास होत आहे.

पानसरेंवर मरणोत्तर गुन्हा दाखल करा, व्हायरल पत्रावर आमदार संजय गायकवाडांची पहिली प्रतिक्रिया काय?

काही मंत्रालयातील कर्मचारी हे उपचारासाठी रुग्णालयात दाखल आहेत सूत्रांची माहितीसर्वात महत्त्वाचं म्हणजे अभ्यंगतांना मंत्रालयात पाणी बॉटल नेण्यास बंदी आहे. त्यामुळे मंत्रालयातीलच पाणी उपलब्ध असते. राज्यभरातून गेल्या आठवड्यात सदर पाणी पिलेल्या सामान्य नागरिकांना देखील त्रास झाला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Exit mobile version