Download App

सलग तिसऱ्या दिवशी अजितदादा कार्यक्रमांना गैरहजर; नाराजीच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) महायुती सरकारमध्ये नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. शनिवारी (2 सप्टेंबर) पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील कार्यक्रम त्यांनी रद्द केले होते. तर काल (3 सप्टेंबर) बुलढाणा येथील शासन आपल्या दारी या कार्यक्रमालाही ते अनुपस्थित होते. आता आज सगल तिसऱ्या दिवशी देखील ते कोणत्याही कार्यक्रमांना आणि बैठकांना उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे माध्यमांमध्येही अजितदादा नाराज असल्याच्या बातम्या आहेत. (Deputy Chief Minister Ajit Pawar is unhappy with the grand coalition government)

मात्र त्यांची तब्येत बरी नसल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. काल बुलढाण्यात बोलताना त्यांनी अजित पवार यांची प्रकृती ठीक नसल्याची माहिती यांनी दिली. ते म्हणाले, अजित पवारांची तब्येत कालपासून बरी नाही. नाराजी वगैरे असं काही नाही. आमच्यामध्ये एकदम फेवीकॉलचा मजबूत जोड आहे. या सरकारला कुठेही अडचण नाही असे मुखमंत्री शिंदे काल स्पष्ट केलं होतं.

जालन्यातील घटनेनंतर राष्ट्रवादी महायुतीत नाराज असल्याचे सांगितले जात आहे. अशात आज सह्याद्री अतिथीगृहात मराठा समाज आरक्षणासंबंधीत मंत्रिमंडळ उपसमिती बैठक बोलवण्यात आली आहे. तसंच मंत्रिमंडळ उपसमितीला सहाय्य करण्यासाठी विशेष सल्लागार समितीची बैठकही आयोजित केली आहे. या दोन्ही बैठकांना अजित पवार उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे जालन्यातील घटनेनंतर अजित पवार नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दोषींवर कठोर कारवाई करणार; अजितदादांनी दिला शब्द

मराठा समाजाला आरक्षणमिळावे ही मागणी रास्त, न्याय्य आहे. या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड किंवा राज्यात कुठेही होणाऱ्या शांततामय आंदोलनाला आमचा राज्यातील नागरिकांचा पाठिंबा आहे. मराठा आरक्षणाचा लढा रस्त्यावर आणि न्यायालयातही तितक्याच ताकदीने लढण्याची आपली सगळ्यांची भूमिका आहे. त्यासाठी आपल्या सगळ्यांची एकजूट आणि सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. यावर आंदोलनाचे यश अवलंबून आहे.

जालना जिल्ह्यातील अंबड येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार, रबरी गोळ्यांचा आणि बळाचा गैरवापर झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. याप्रकरणी पोलिसांच्या भूमिकेची सखोल, निष्पक्ष चौकशी करण्यात येईल आणि दोषी पोलिसांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा विश्वास मी राज्यातील नागरिकांना देतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

Tags

follow us