ठाणे शिवसेनेकडं दिलं होत गद्दाराकडं नाही; ठाण्यात जाऊन उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर घाव
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपवर घणाघात केला. ते ठाण्यात महानगरपालिकेच्या प्रचार सभेत बोलत होते.
आता निवडणुका संपल्या, आता नेमणुका सुरू झालेल्या आहेत. (Thane) ही शेवटची निवडणूक आहे असं वाटतय. आता देश पंतप्रधान चालवणार नाहीत, राज्य मुख्यमंत्री चालवणार नाहीत तर उद्योगपती हे चालवतील असंत दिसतय. त्याचबरोबर, आम्ही भाऊ 20 वर्षानंतर एकत्र आलो त्यावरून मोठा विषय चर्चेला घेतला. तुमचं जागावाटप कसं झालं तर आमचं जागा वाटप नाही ही आमचीच जागा आहे अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपवर घणाघात केला. ते ठाण्यात महानगरपालिकेच्या प्रचार सभेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मनसे प्रमुख राज ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊतही उपस्थित होते.
माझ्या उमेदवारांना 15 कोटींची ऑफर; ठाण्यातील सभेत राज ठाकरेंचा भाजपवर थेट प्रहार
सामान्य जनतेची ही शेवटची निवडणूक असेल. कारण यानंतर राज्याचे मुख्यमंत्री राज्य चालवतील असं वाटत नाही. महापौर कोण होणार? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे. उद्ध ठाकरे म्हणाले की, एकत्र येत नव्हतो तेव्हा एकत्र कधी येणार असा सवाल केला जात होता. आता आलोय तरी देखील हाच प्रश्न विचारला जात आहे. पण आम्ही मराठी माणूस जागा करण्यासाठी आमची युती झालीय. मराठी मराठी करताय इतर भाषिकांचं काय? आमच्या घरात जो दादागिरी करतोय त्याला त्याच भाषेत उत्तर दिलं नाही तर का छत्रपतींचं राज्य कसलं? उभा चिरतील त्याला. सहनशील आहे सगळ्यांना आपलं मानत आलोय. पण आपलं आपलं करता त्यांना कानफटवलं तर काय होईल. गद्दार मुंबईचा गेलाय. मराठी माझी आई हिंदी माझी मावशी… आई मेली तरी चालेल. गद्दार लोकं महाराष्ट्रात कसे चालतात असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
गद्दार म्हणत शिंदेंवर टीका
जो माणूस शिवसेनेशी गद्दारी करतो तो माणूस आता ठाण्याशी गद्दारी करतो, असं म्हणत एकनाथ शिंदेंवर टीका केली. बावनकुळेंचा समाचार केला. मुख्यमंत्री असताना माझ्या काळात जेवढी जंगल वाढवली तेवढं काम कुणीच केलं नाही. गणेश नाईक यांनी बिबट्यांबाबत आदेश काढले की, ‘शूट ऍट साईट’. पण जंगलाची जमिन जो कुणी सही करुन विकत आहे. त्याला ‘शूट ऍट साईन’ असं वनमंत्री गणेश नाईक करुन दाखवणार का? ही खेचाखेची सुरु आहे ती का खेचताय?
जुनं ठाणं कसं होतं?
ठाण्यात बैलगाडीतून प्रचार केला जात असे. 2012 शेवटची महानगरपालिका झाली, ज्या सभेत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी भाषणं केलं. आम्ही सांगत होतो सभा घेऊ नका पण दोनच घेणार असा शब्द बाळासाहेबांनी दिला. ते म्हणाले एक मुंबई आणि दुसरं माझं ठाणं या ठिकाणी सभा घेतली. बाळासाहेबांचं प्रेम ठाण्यावर होतं. भाषणाच्या वेळी एक चिठ्ठी आली त्यामध्ये लिहिलं होतं आमच्याकडे नाट्यगृह नाही. महापालिका द्या, नाट्यगृह दिलं. … तसं काशिनाथ घाणेकर, गडकरी रंगायतन बांधून दिलं.
BMC वर कर्ज
गंगाजल म्हणजे ठेवी. 92 हजार कोटीपर्यंत नेली. 70 हजार कोटी पर्यंत काढली. व्याजावर महापालिकेची अनेक काम होतं. पैसा परत कुठून येणार. मुंबईच्या डोक्यावर 3 कोटीचं कर्ज. तिजोरीत काय शिल्लक ठेवलंय की नाही. काही महिन्यांपूर्वी नरेंद्र मोदी म्हणाले होते की, बँकेत पैसे ठेवून विकास होत नाही. FD करुन फायदा नाही. देश अदानीच्या हातात द्यायचा. महापालिका भिकारी करायची. सगळे उद्योग गुजरातला गेले. ऑक्ट्रॉच्या निमित्ताने जो पैसा यायचा त्याची आवक बंद केली. मग आता महापालिका कशी चालवायची? मी मुख्यमंत्री होतो तेव्हा दिल्लीतून पैसे यायचे नाहीत. महापालिकांचा खजिना खणून काढायचे. इंग्रजांनी जेवढं लुटलं नाही तेवढे भाजपवाले लुटत आहेत. नगरसेवक पदासाठी करोडे रुपये वाटतात. कुणाच्या खिशातून पैसा काढणार.
ठाण्यातील पोस्टरवर टीका
मिंदे सरकारने ठाण्यात पोस्टर लावले आहेत. ज्यामध्ये विकासाची नाही विनासाची गती आहे. कामं तत्परतेने मंजूर केलं जात आहे. मुलूंडच्या मेट्रोच्या इथे 100 ठिकाणी पर्यावरणाचा धोका निर्माण झाला. मुंबईत श्वास घेताना त्रास होतो. उद्या काही झालं तर ठाण्यातील गद्दार, आनंद दिघे बोलले होते ते जातील 5 स्टार शेतात हेलिकॉप्टरने, दुसरे जातील नागपूरला आणि तिसरे जातील काका मला वाचवा. आपण दोघेही फसलो आहोत. वचनाची पूर्तता पुस्तकात दाखवली आहे. कोस्टल रोड मुंबईकरांच्या पैशाने केलं आहे. त्यांनतर आपला दवाखाना ही योजना आखली. सरकार पाडलं अन् फित कापली. ठाण्यात साड्यांचं दुकान काढलं. ज्यांना कॉन्ट्र्क्ट दिलं पगार दिले नाही त्यामुळे बंद.
