प्रशांत गोडसे, मुंबई प्रतिनिधी
Mumbai Police Commissioner Deven Bharti : वरिष्ठ पोलीस अधिकारी देवन भारती यांची (Mumbai Police Commissioner Deven Bharti) मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त पद सध्या त्यांच्याकडे आहे. विवेक फंसाळकर हे आज निवृत्त झाले आहे. मुंबई पोलीस आयुक्त पदाच्या शर्यतीत सदानंद जाते, संजय कुमार वर्मा. रितेश कुमार. महिला पोलीस अधिकारी अर्चना त्यागी यांच्या नावाची चर्चा होती. देवेन भारती यांच्याकडे देखील मुंबई पोलीस आयुक्त पदाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. देवेन भारती (Deven Bharti) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मानले जातात. मुंबई पोलीस (Mumbai Police) आयुक्त देवेन भारती आहे तरी कोण समजून घेऊया.
देवेन भारती हे 1994 बॅचचे आयपीएस अधिकारी आहे. 2014 साली राज्यात युती सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना देवेन भारती हे मुंबई पोलीस दलात सह आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था ) आणि एटीएस प्रमुख अशा महत्त्वाच्या पदावर कार्यरत (Mumbai Police Commissioner) होते. 2019 साली राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांची वाहतूक विभागाचा आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर अवघ्या सव्वा महिन्यातच त्यांची अप्पर पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळावर नियुक्ती करण्यात आली होती. जो की, महत्त्वाचा विभाग मानला जात नाही.
Reshma Shinde : रेश्माचा केशरी रंगाच्या साडीतील क्यूट लूक; चाहत्यांचे वेधले लक्ष…
महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचा सरकार स्थापन झालं. त्यानंतर मुंबई पोलीस दलाच्या इतिहासात प्रथमच विशेष पोलीस आयुक्त पद तयार करण्यात आलं. त्यावर देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आली. मुंबई पोलीस दलातील विशेष पोलीस आयुक्त पदावर बसणारे ते पहिले आयपीएस अधिकारी ठरले. विशेष म्हणजे या पदासाठी वेगळ्या कॅडरची निर्मिती करण्यात आली. मुंबई सहपोलीस आयुक्त पदावर (कायदा आणि सुव्यवस्था ) सर्वात जास्त काळ विराजमान होणारे अधिकारी आहेत. दोन वर्षापासून मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त पदही त्यांच्याकडे आहेत. महाराष्ट्रातील एक गतिमान पोलीस अधिकारी म्हणून त्यांची गणना केली जाते.
ज्युनियर डॉक्टरांना ‘रॅगिंग’ करणं पडलं महागात; थेट मंत्रालयातून आदेश, पुण्यात तीन विद्यार्थी निलंबित
भारती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निकटवर्तीय मानले जातात. त्यांनी हाय प्रोफाईल प्रकरणांचा तपास केला आहे. 26/11 मुंबई दहशतवादी हल्ला, मिडचे वृत्तपत्राचे पत्रकार जेडी यांची हत्या या प्रकरणाचा तपास देखील त्यांनी केला आहे. राज्यातील इंडियन मुजाद दिन या दहशतवादी संघटनेत नष्ट करण्यात त्यांचा मोठा हात आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांच्यावर आरोप झाला. भाजप नेते हैदर आजम यांच्या पत्नी विरुद्ध एफआयआर नोंदवला नसल्याचा आरोप करत त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली होती. मात्र, तपासात कोणतेही पुरावे सापडले नसल्याने मुंबई गुन्हे शाखेने दाखल केलेल्या आरोपपत्रात त्यांचं नाव नव्हतं. तसेच दाऊद इब्राहिम संबंधित गुन्हेगारी संबंध असल्याचा आरोप देखील गुन्हेगार विजय पलांडेने केला होता. याप्रकरणी माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी देवन भारती यांच्या विरोधातील चौकशी अहवाल सादर केला होता. मात्र, नोव्हेंबर 2022 मध्ये शिंदे फडणीस सरकारने सदर चौकशी अहवाल फेटाळून लावला होता.
राकेश मारिया – देवेन भारती वाद
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी लिहिलेल्या आत्मकथा (Rakesh Maria – let me say it now) पुस्तकामध्ये शीना बोरा हत्याकांड प्रकरणात दोन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांनी माहिती लपवण्याचा आरोप केला आहे. त्यातील एक अधिकारी देवेन भारती यांचा उल्लेख आल्याने दोघांमध्ये मोठा वाद निर्माण झाला. सदर प्रकरणात आपण कोणतीही माहिती लपवली नसून सर्व माहिती पोलिसांच्या रेकॉर्डवर आहे. राकेश मारियाचे कुटुंबीय बॉलिवूडशी संबंधित असून पुस्तकाच्या मार्केटींगसाठी त्यांनी हे केल्याची, प्रतिक्रिया देवेन भारती यांनी दिली होती.