२६/११ हल्ल्याच्या तपासाचे नेतृत्व अन् फडणवीसांच्या मर्जीतील देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त

Deven Bharti to be the new Police Commissioner of Mumbai : मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या निवृत्तीनंतर आता आयपीएस अधिकारी आणि २६/११ हल्ल्याच्या तपासाचे नेतृत्व करणारे देवेन भारती (Deven Bharati) यांची मुंबईचे नवे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. देवेन भारती १९९४ च्या बॅचचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत सध्या पोलिस मुख्यालयात विशेष पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत होते.
Deven Bharti to be the new Police Commissioner of Mumbai. He will take charge after the retirement of Vivek Phansalkar, who is retiring today.
(file pic) pic.twitter.com/ba25t1LdA4
— ANI (@ANI) April 30, 2025
कोण आहेत देवेन भारती?
देवेन भारती १९९४ च्या बॅचचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी असून, ते, मूळचे बिहारमधील दरभंगा येथील आहेत. त्यांनी झारखंडमधून मॅट्रिक केले आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवी प्राप्त केली. त्यांनी मुंबईत डीसीपी, झोन 9 आणि डीसीपी गुन्हे शाखा म्हणून काम केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) मर्जीतील अधिकारी म्हणून देवेन भारती यांची ओळख आहे.
Video : एका झटक्यात पूर्ण पाकिस्तान संपवून टाका, हत्यारं संपली तर वर्गणी…; जरांगेंनीही दंड थोपटले
फडणवीसांच्या कार्यकाळात मुंबईतील प्रभावी पोलीस अधिकारी
2014 ते 2019 दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात मुंबईतील प्रभावी पोलीस अधिकारी होते. तेव्हा ते सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) होते. त्यानंतर त्यांना अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून बढती देऊन दहशतवाद विरोधी पथकात नेमण्यात आले. देवेन भारती यांनी मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासासह अनेक मोठ्या गुन्ह्यांचा तपास केला आहे. भारती यांनी मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त, मुंबईत सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) पदावर काम केले आहे. त्यानंतर त्यांनी मुंबई गुन्हे अन्वेशन शाखेचे सहाय्यक आयुक्त व महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकात काम केले आहे.