देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीतील आयपीएस अधिकारी देवेन भारती यांच्यावर मोठी जबाबदारी!

देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीतील आयपीएस अधिकारी देवेन भारती यांच्यावर मोठी जबाबदारी!

मुंबई : आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची मुंबईच्या विशेष पोलिस आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आलीय. गेल्या काही दिवसांपासून देवेन भारती यांच्या बदलीची शक्यता वर्तवण्यात येत होती. विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात. त्यांच्या नियुक्तीबाबत फडणवीस अनुकूल असल्याचं सांगितलं जात होतं.

अखेर देवेन भारती यांची नियुक्ती आता मुंबईच्या विशेष पोलिस आयुक्तपदी करण्यात आली आहे. देवेन भारती आधी विशेष सीपी म्हणून कार्यरत होत्या. देवेन भारती 1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. देवेंद्र फडणवीस ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्या काळात एक प्रभावी पोलिस अधिकारी म्हणून त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.

देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असताना २०१४ ते २०१९ या काळात देवेन भारती यांच्या खांद्यावर अनेक महत्त्वाच्या पदांची धुरा सोपवण्यात आली होती. फडणवीसांच्या काळात ते सहआयुक्त होते. त्यानंतर त्यांना अतिरिक्त पोलिस महासंचालक म्हणून प्रमोशन देऊन दहशतवाद विरोधी पथकामध्ये नियुक्त करण्यात आले.

त्यांनंतर 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात आयपीएस अधिकार्‍यांसाठी सर्वांत कमी दर्जाची असाईन्मेंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशनचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालकदावरुन देवेन भारती यांना हटवण्यात आलं.

13 डिसेंबर 2022 रोजी देवेन भारती यांच्याजागी सहआयुक्त (वाहतूक) राजवर्धन यांची नियुक्ती करण्यात आली आणि तेव्हापासून ते नियुक्तीच्या त्या प्रतिक्षेत होत्या.

दरम्यान, राज्यातील सत्तासंघर्षानंतर अनेक बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यावर तडाखा सुरु असून देवेन भारती यांची मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्त नियुक्ती झाल्याने विविध चर्चांना उधाण आलंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube