Download App

भाजपचे ‘सुमार’ मंत्री फडणवीसांच्या रडारवर; कामगिरी सुधारा अन्यथा…

  • Written By: Last Updated:

BJP Core Committee Meeting Mumbai : आगामी काळात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार असून, त्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी केली जात आहे. त्याचाच एक भाग असलेली एक बैठक काल (दि.28) मुंबईत पार पडली. या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी भाजपच्या सुमार मंत्र्यांना कामगिरी सुधारण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे. तसेच जर काही अडचणी येत असतील तर मला सांगा असेही फडणवीसांनी मंत्र्यांना सांगितले आहे. राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या पर्णकुटी येथे रात्री भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली त्यात भाजपच्या सुमार कामगिरी असणाऱ्या मंत्र्यांची फडणवीसांनी कानउघडणी केल्याचे सांगितले जात आहे.

या बैठकीत फडणवीसांनी मंत्र्यांना भाजप कार्यकर्त्यांची कामं प्राधान्यानं करा अशा सूचनाही दिल्या आहेत. आपल्याला आगामी लोकसभेत मिशन 45 पूर्ण करायचं असून, त्यासाठी कामगिरी उत्तमच हवी घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचवावे तसेच निर्यण घेताना काही अडचणी येत असलीत तर मला सांगा असेही फडणवीसांनी सांगितले आहे.  या बैठकीत शिंदे-फडणवीस सरकारमधील भाजपच्या मंत्र्यांच्या कामाचा फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आढावा घेतला.

Rocky Aur Rani Ki Prem Kahani चं पहिलं गाणं रिलीज; अल्पावधीतच प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद

मविआला टक्कर देण्यासाठी अधिक आक्रमक व्हा
राज्यात मविआला टक्कर द्यायची असेल तर अधिक आक्रमक व्हा अशा सूचनाही फडणवीसांनी बैठकीत मंत्र्यांना दिल्या असून, लोकसभेत भाजपला मिशन 45 पूर्ण करायचे आहे. त्यासाठी कामगिरी सुधारण्याबरोबर तुम्ही केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवा. स्थानिक पातळीवर निर्णय घेताना काही अडचणी येत असतील तर मला सांगा असे म्हणत भाजप कार्यकर्त्यांची कामे प्राधान्याने करण्याच्या सूचनाही फडणवीसांनी दिल्याचे सांगितले जात आहे.

विदर्भ, मुंबईतील ‘या’ लोकसभा जागेवरून काँग्रेस-ठाकरे गटात होणार ताणाताणी ?

48 पैकी 45 जागांचं भाजपचं लक्ष
दुसरीकडे राज्यातील आगामी लोकसभेच्या निवडणुकांसाठी भाजपनं लोकसभेच्या एकूण 48 जागांपैकी 45 जागा जिंकण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. यासाठी काही दिवसांपूर्वी काही केंद्रीय मंत्रीदेखील राज्याचा दौरा करून गेले आहेत. याशिवाय भाजपकडून विधानसभेसाठीदेखील रणनीती आखण्यास सुरूवात करण्यात आली असून, भाजपचे प्रमुख नेते विधानसभेच्या 144 मतदारसंघाचे दौरे करणार आहेत.

Tags

follow us