Devendra Fadanvis Criticize Uddhav Thackeray On Voting : देशभरात पाचव्या टप्प्यातील लोकसभेसाठी आज मतदान सुरू आहे. मात्र या दरम्यान मुंबईमधील काही मतदान केंद्रावरून संथ गतीने मतदान होत आहे. मतदारांना वेठीस धरलं जात आहे. त्यावर उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) कारवाईची मागणी केली आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ( Devendra Fadanvis ) प्रत्युत्तर देत ठाकरेंकडून 4 जूननंतरच्या स्थितीला सामोरे जाण्याच्या पार्श्वभूमीची तयारी करत असल्याचं म्हटलं आहे.
जंगली रमीबद्दल सचिन तेंडुलकर दखल घेणार नसतील तर तीव्र आंदोलन करणार -बच्चू कडू
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबईत संथ गतीने मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच आयोगाकडे केली. आता मात्र, नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी त्यांचे रडगाणे सुरु केले आहे. पराभव समोर स्पष्ट दिसत असताना त्यांनी सवयीप्रमाणे मोदीजींवर आरोप करणे प्रारंभ केले आहे. 4 जूननंतरच्या स्थितीला सामोरे जाण्याची पार्श्वभूमी ते आताच तयार करीत आहेत. शिवाय निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांना धमक्याही दिल्या जात आहेत. माझी तमाम मुंबईकरांना विनंती आहे की, मतदान केंद्रावर जा आणि मोठ्या संख्येने मतदान करा. 6 वाजले तरी जितके लोक आतमध्ये असतील, त्या प्रत्येकाला मतदान करता येते. त्यामुळे मतदानाचा आपला हक्क बजावल्याशिवाय राहू नका. असं उत्तर फडणवीसांनी दिलं आहे.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी जाणूनबुजून काही ठिकाणी अडचणी निर्माण केल्या जात आहेत. तसंच, आमच्या लोकांना अडचणी निर्माण केल्या जात आहेत असा थेट आरोप केला आहे. तसंच, याबाबत योग्य ती खबरदारी निवडणूक अधिकाऱ्यांकडून घेतली नाही तर आपण न्यायालयात जाऊ असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. तसंच, येथून अनेक लोकांचे आपल्याला अडचण येत आहे अशा प्रकारचे फोन आपल्याला आले आहेत असंही ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.
केजरीवालांविरोधात ED न्यायालयात; 14 दिवसांच्या कोठडीची मागणी…
अशा पद्धतीने लोकांना त्रास दिला जात असेल तर मतदानासाठी आलेल्या लोकांचं उद्या सकाळी 7 वाजपर्यंत मतदान घेण्याची वेळ आली तरी घावं लागेल. अन्यथा आपण यामध्ये हस्तक्षेप करू असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. त्याचबरोबर मुंबईत मतदानाचं ढिसाळ नियोजन केलं आहे असा थेट आरोप उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला आहे. अनेक ठिकाणी मतदान केंद्रावर मतदारांचा खोळंबा झाला असही ठाकरे म्हणाले.