Devendra Fadanvis Not My Father Banner In Thane : ठाकरे बंधू एकत्र येणार, अशी चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जोर धरून आहे. परंतु यासंदर्भात अजून कोणतीही ठोस बातमी समोर आलेली नाही. आता संदेश नाही, बातमीच देतो असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगितलं (Devendra Fadanvis) होतं. याला आता पाच दिवस उलटले आहेत. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन सुरू असल्याचं समजतंय. तर मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. नवीन राजकीय समीकरणांना देखील वेग आलाय. अशातच एका बॅनरची चर्चा सध्या राज्यभर (Maharashtra Politics) गाजली आहे.
Video : लॉस एंजेलिस आउट ऑफ कंट्रोल; अॅपलच्या दुकानात तोडफोड अन् लुटालूट
मनसे शिवसेना युतीचं गुऱ्हाळ
हे बॅनर नेमकं कोणाचं आहे . कोणी लावलंय? या बॅनरवर लिहिलेला मजकूर चर्चेचा विषय का ठरत आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मी तुषार दिलीप रसाळ. दिलीप पंढरीनाथ रसाळ हे माझे जन्मदाता (बाप). मा. देवेंद्र गंगाधर फडणवीस, हे माझे बाप नाहीत. दोन मराठी वाघाने एकत्र येणे ही महाराष्ट्राची इच्छा आहे, असा मजकूर या बॅनरवर (Devendra Fadanvis Father) लिहिलेला आहे. ठाण्यातील (Thane) तिन हात नाक्यावरील बॅनर लावण्यात आला आहे.
ENG vs WI : वनडेनंतर टी 20 तही विंडीजचा सुपडा साफ; इंग्लंडचा विजयी षटकार
बॅनरची चर्चा राजकीय वर्तुळात
विशेष म्हणजे या बॅनरवर दोन्ही ठाकरेंचे फोटो देखील आहेत. उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे यांचे बाळासाहेब ठाकरेंसोबत असलेले फोटो या बॅनरवर लावण्यात आले आहेत.
सध्या या बॅनरची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. मंत्री नितेश राणे यांना डिवचण्यासाठी हे बॅनर लावण्यात आल्याचं बोललं जातंय.
आम्हाला घाम फुटला
तुळजापूरात उ मंत्री नितेश राणे यांनी ठाकरे बंधूंची खिल्ली उडवली होती. आम्हाला झोप लागत नाही, असं त्यांनी म्हटलं होतं. एकाकडे वीस आमदार तर दुसऱ्याकडे शून्य अशी यांची शक्ती आहे. आम्ही या शक्तीला घाबरलो आहे. आम्हाला घाम फुटला आहे, अशा शब्दांत नितेश राणे यांनी टीका केली होती. तर धाराशिवच्या मेळाव्यात त्यांनी
‘सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय, सगळ्यांनी लक्षात ठेवा’, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतरच हे बॅनर लावण्यात आले आहेत.