ENG vs WI : वनडेनंतर टी 20 तही विंडीजचा सुपडा साफ; इंग्लंडचा विजयी षटकार

ENG vs WI : वनडेनंतर टी 20 तही विंडीजचा सुपडा साफ; इंग्लंडचा विजयी षटकार

England thrash West Indies to complete T20 Clean Sweep : एकदिवसीय मालिकेतील पराभवानंतर टी 20 मालिकेतही विंडीजचा दारुण (ENG vs WI) पराभव झाला आहे. हॅरी ब्रूकच्या नेतृत्वातील इंग्लंडने चौथ्या आणि (Eng vs WI t20) अखेरच्या टी 20 सामन्यात वेस्टइंडिजचा 37 धावांनी पराभव (West Indies) केला. या विजयासह इंग्लंडने तीन सामन्यांची मालिका 3-0 अशा फरकाने जिंकली. याआधी एकदिवसीय मालिकेतही इंग्लंडने चमकदार कामगिरी केली होती. वनडेतही वेस्टइंडिजचा सुपडा साफ झाला होता. एकही सामना विंडीजला जिंकता आला नाही. यानंतर टी 20 मालिकेतील अखेरच्या सामन्यात वेस्टइंडिजची पुरती फजिती झाली.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने तब्बल 238 धावांचा डोंगर उभा केला. सुरुवातीपासूनच इंग्लिश फलंदाजांनी विंडीजच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. इंग्लंडने दिलेले आव्हान वेस्टइंडिजला पार करता आले असते. एखाद्याने जर शतक केले असते तर जिंकण्याची शक्यता होती. परंतु, इंग्लंडच्या गोलंदाजांपुढे विंडीज फलंदाच फार काळ टिकू शकले नाहीत. वेस्टइंडिजला फक्त 211 धावाच करता आल्या.

आफ्रिकेनंतर ऑस्ट्रेलियाही सज्ज; WTC Final साठी ‘या’ 11 खेळाडूंना संधी  

इंग्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या वेस्टइंडिज संघाची सुरुवात अतिशय खराब राहिली. 119 धावांवरच आघाडीचे पाच फलंदाज बाद झाले होते. सलामीवीर ईविन लुईस आणि जॉन्सन चार्ल्स 9-9 धावा करुन बाद झाले. यानंतर आलेल्या शिमरोन हेटमायेरने आक्रमक फलंदाजी केली. त्याने 8 चेंडूंत 26 धावा केल्या. यात तीन चौकार आणि एक षटकाराचा समावेश होता. पण यानंतर हेटमायेर लगेचच बाद झाला.

शेरफेन रदरफोर्डने फक्त एक रन केला. यानंतर कर्णधार शाय होप याने 27 चेंडूत 45 धावा केल्या. रोमारियो शेफर्डला इंग्लंडच्या आदिल राशिदने शून्यावरच बाद केले. दुसऱ्या बाजूला रोवमॅन पॉवेलने डाव सावरला होता. पॉवेलने 45 चेंडूत नाबाद 79 धावा केल्या. जेसन होल्डर 25 धावा करुन बाद झाला. इंग्लंडकडून वेगवान गोलंदाज ल्यूक वूडने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.

याआधी प्रथम फलंदाजी करताना इंग्लिश फलंदाजांनी चांगली सुरुवात केली होती. जेमी स्मिथ आणि बेन डकेट (Ben Duckett) या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 120 धावांची भागीदारी केली. स्मिथने 26 चेंडूत 60 धावा केल्या. जोस बटलरने 10 चेंडूत 22 धावा केल्या. तर बेन डकेटने 46 चेंडूत 84 धावा केल्या. कर्णधार हॅरी ब्रूकने 22 चेंडूत 35 धावा केल्या. ब्रूक नाबाद राहिला. यानंत जेकब बॅथेलने 16 चेंडूत 36 धावा केल्या. वेस्टइंडिजच्या अकील हुसेन, गुडाकेश मोती आणि रदरफोर्ड यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.

क्रिकेटविश्वात खळबळ! अवघ्या 29 व्या वर्षीच विंडीजचा धडाकेबाज खेळाडू निवृत्त; निकोलसची भावूक पोस्ट..

follow us
  • fb
  • instagram
  • youtube