Download App

मेगा भरतीत मराठा आरक्षण लागू होणार? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Devendra Fadnavis On Maratha Reservation Bill : एकदा मराठा आरक्षणाचा कायदा पारित झाल्यानंतर, जेवढ्या काही नोकर भरतीच्या (Recruitment of employees)जाहिराती येतील त्यात मराठा समाजाला आरक्षण ( Maratha Reservation)मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. विशेष अधिवेशन घेऊन राज्य सरकारने (State Govt)मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis )यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

Udhhav Thackeray : मराठा समाजाला कुठे नोकरी देणार सरकारने सांगावे; ठाकरेंचा सरकारला रोखठोक सवाल

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमच्या सरकारने मराठा समाजाला SEBC प्रवर्गातून 10 टक्के आरक्षण नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणामध्ये देण्याचं विधेयक सभागृहात मांडलं होतं. ते विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. त्यामुळे आता मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Maratha Reservation Bill : मराठा समाजाची सरकारकडून पुन्हा फसवणूक, विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

आज मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण विधेयक पटलावर मांडले. त्यानंतर कोणत्याही चर्चेविना हे विधेयक मंजूर करण्यात करण्यात आले. त्यावेळी सर्वत्र या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. सत्ताधारी पक्षांकडून गुलाल उधळण्यात आला.

त्याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण विधेयकाला पाठिंबा दिल्याबद्दल विरोधी पक्षाचेही आभार मानले. ते म्हणाले की, मला विश्वास आहे की, एकीकडे आम्ही मराठा आरक्षणाचा प्रश्न आम्ही सोडविला आहे. पण दुसरीकेडे ओबीसी समाजाला कुठेही अडचण होईल, त्यांच्या आरक्षणाला वाटेकरी होईल असा कोणताही मार्ग आम्ही स्वीकारला नाही. ओबीसी समाजाला पूर्णपणे सुरक्षित केलं आहे.

follow us