Udhhav Thackeray : मराठा समाजाला कुठे नोकरी देणार सरकारने सांगावे; ठाकरेंचा सरकारला रोखठोक सवाल
Udhhav Thackeray : मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Shinde) यांनी केली. मात्र यावर उद्धव ठाकरे ( Udhhav Thackeray ) यांनी मराठा समाजाला कुठे नोकरी देणार सरकारने सांगावे असा सवाल उपस्थित केला आहे. ते आरक्षणाच्या निर्णयावर माध्यमांशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
Maratha Reservation Bill : मराठा समाजाची सरकारकडून पुन्हा फसवणूक, विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
ठाकरे म्हणाले की, मराठा समाजाला सांगू इच्छितो. ज्या ज्या वेळी हा ठराव समोर आला. त्या त्या वेळी एकमताने मंजूर झाला आहे. मला खात्री आहे की, हा कायद्याच्या चौकटीत हा कायदा टिकेल अशी आमची इच्छा आहे. मराठा समाजातील अनेकांना बळी द्यावा लागला आहे. मी जरांगे यांना जाऊन भेटलो. ज्या निर्घृणपणे निर्दयीपणाने डोकी फोडली ती आवश्यकता नव्हती. शांतपणे हा विषय सोडवता आला असता. मुख्यमंत्री यांना धन्यवाद देतो.
उत्तर प्रदेशात ‘सपा’ला धक्का! निवडणुकीआधीच ‘या’ दिग्गज नेत्याचा तडकाफडकी राजीनामा
तसेच हे आरक्षण शिक्षण आणि नोकरीमध्ये दिल आहे. मराठा समाजातील बांधवांना कुठे नोकरी देणार? सरकारने सांगितलं तर सोन्याहून पिवळं होईल. निवडणुकांसाठी हे आरक्षण देण्यात आलं असं मी आज बोलणार नाही. मला आता राजकारण आणायचं नाही. छगन भुजबळ असो किंवा आमचं सगळ्यांचे असं मत होतं की, कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता दिलं पाहिजे. अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.
राज्य विधिमंडळाच्या विशेष (Maratha Reservation) अधिवेशनात आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मराठा आरक्षण विधेयक सभागृहात मांडले. मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यानंतर विधेयकावर मतदान होऊन विधेयक मंजूर झाल्याची घोषणा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी केली. ओबीसी बांधव असो की अन्य कोणताही समाज असो आम्ही कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजासाठी शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.