Download App

कोट्यावधींचे हिरे, बँकॉकला पळण्याची तयारी पण, प्लॅन फसला; मुंबईत 9 कोटींचे हिरे, सोने जप्त..

विमानतळावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) केलेल्या कारवाईत तब्बल 4 कोटी 93 लाख रुपयांचे सिंथेटिक हिरे व सोने जप्त करण्यात आले आहेत.

प्रशांत गोडसे, मुंबई 

Mumbai News : मुंबईमधील आंतरराष्ट्रीय विमानतळावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) केलेल्या कारवाईत तब्बल 4 कोटी 93 लाख रुपयांचे सिंथेटिक हिरे व सोने जप्त करण्यात आले आहेत. बँकॉकला जाणाऱ्या प्रवाशाच्या हातातील बॅगेमध्ये सदर हिरे लपवून तस्करी करण्यात येत होती. बँकॉक येथे जाणाऱ्या प्रवाशाने त्याच्या लॅपटॉपच्या बॅगेत हिरे लपवून ठेवले होते. परंतु, विमानतळावर त्याची ही चालाखी पकडली गेली.

टर्मिनल 2 येथून बँकॉक जाण्याच्या तयारीत असलेल्या या प्रवाशाच्या बॅगेत संशयास्पद वस्तू दिसली. विमान उड्डाण करण्याआधीच सीआयएसएफचे कर्मचारी सुबोधकुमार यांना एक्स-बीआयएस मशीनवर संशयास्पद चित्र दिसले. त्यामुळे या प्रवाशाच्या बॅगेची तपासणी करण्यात आली. सीआयएसएफचे उपनिरीक्षक मीना मुकेश कुमार यांनी त्या बॅगेची तपासणी केल्यावर त्यामध्ये लॅपटॉपच्या बॅटरीच्या डब्यात लपवलेले 26 सिंथेटिक हिरे जप्त करण्यात आले.

Mumbai Gate Way Of India : बोट दुर्घटनेच्या बचावकार्याला वेग द्या; डेडिकटेड कॉमन मॅन शिंदेंचे निर्देश

सीआयएसएफने तत्काळ या प्रवाशाला सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटकडे सोपवण्यात आले. एआईयू/सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जप्त करण्यात आलेले सिंथेटिक हिरे सुमारे 2147.20 कॅरेटचे असून त्याचे बाजारातील मूल्य 4 कोटी 93 लाख रुपये आहे. प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. प्रवासी भरत गोविंद नथानी याला अटक करण्यात आली आहे.

सोनेही जप्त केले

सीमाशुल्क विभागाने 5 किलो 92 ग्रॅम सोनेही जप्त केले. या सोन्याची तस्करी करणाऱ्या प्रवाशांनी त्यांची अंतवस्त्रे व बॅगेच्या ट्रॉलीमध्ये सोने लपवले होते. तर, दुबईहून मुंबईत आलेल्या तीन प्रवाशांकडून 775 ग्रॅम वजनाचे 24 कॅरेट सोने जप्त करण्यात आले. त्याशिवाय नैरोबी येथून मुंबईत आलेल्या केनियाच्या 14 प्रवाशांकडून 2741 ग्रॅम वजनाचे 1 कोटी 85 लाख रुपयांचे 2 हजार 401 ग्रॅम सोने जप्त केले आहे.

Mumbai News : अंधेरी पूर्व भागात सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग; काही कामगार अडकल्याची भीती

follow us