Download App

राजीनाम्यानंतरही तात्याराव लहानेंच्या अडचणी कायम! परवानगी न घेता 698 शस्त्रक्रिया; चौकशी समितीचा ठपका

  • Written By: Last Updated:

Dr. TatyaRao Lahane : काही दिवसांपूर्वी मुंबईतील सुप्रसिद्ध जे.जे. रुग्णालयातील (J.J. Hospital) निवासी डॉक्टरांनी अनेक आरोप करत आंदोलनचा पवित्रा घेतला होता. त्यानंतर विविध पदांवर कार्यरत असलेल्या वरिष्ठ डॉक्टरांनी अचानक राजीनामा दिले होते. प्रख्यात नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने (Dr. TatyaRao Lahane) यांनीही आपला राजीनामा दिला होता. यामुळे वैद्यकीय जगतात खळबळ उडाली होती. यानंतर राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन केली होती. या समितीने आता आपला अहवाल जारी केला असून त्यात तात्याराव लहाने यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. (Dr. TatyaRao Lahane performed 698 illegal surgeries, serious allegation of inquiry committee)

तात्याराव लहाने यांच्यावर जे.जे. रुग्णालयाच्या त्रिसदस्यीय समितीने गंभीर आरोप केले आहेत. लहाने यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून अधीक्षक डॉ. संजय सुरसे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने प्राथमिक अहवाल रुग्णालय प्रशासनाला सादर केला आहे. जेजे रुग्णालयाच्या तीन सदस्यीय समितीने तात्याराव लहाने यांच्यावर 698 शस्त्रक्रिया विनापरवानगी केल्याचा आरोप केला आहे.

या अहवालात सांगितले की, ऑगस्ट 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत कोणत्याही पदावर नसतांना डॉ. लहाने यांनी जेजे रुग्णालय प्रशासनाची परवानगी न घेता नेत्र शस्त्रक्रिया केल्याचा आरोप त्रिसदस्यीय समितीने केला.

संजय मंडलिक ‘कमळावर’ लढणार? कोल्हापूर घेत भाजपने कल्याणचा दावा सोडल्याची चर्चा 

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्थेच्या संचालकपदावरून निवृत्त झाल्यानंतर आणि राज्य सरकारने अंधत्व निवारण अभियानाच्या समन्वयकपदी लहाने यांची निवड झाल्यानंतरच या शस्त्रक्रिया केल्याचा आरोप समितीकडून करण्यात आला आहे. नेत्ररोग विभागाच्या माजी प्रमुख डॉ. रागिणी पारेख यांना रुग्णालय प्रशासनाने कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे.

दरम्यान, परवानगीशिवाय कोणतीही शस्त्रक्रिया झाली नसल्याचे प्रतिक्रया डॉ. तात्याराव लहाने यांनी दिले. परवानगी घेऊनच मी कामाला सुरुवात केली. त्रिसदस्यीय समितीने आमची बाजू ऐकून घेतली नाही. या आरोपांमध्ये तथ्य नसून हा एकतर्फी अहवाल मांडण्यात आल्याचे लहाने यांनी म्हटले आहे.

दरम्यान, 698 शस्त्रक्रिया विनापरवानगी केल्याचा आरोप झाल्यानं डॉ.तात्याराव लहाने यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आरोप गंभीर असल्याने या प्रकरणाची आणखी उच्चस्तरीय चौकशी होण्याची शक्यता आहे.

Tags

follow us