ट्रक चालकांच्या संपाचा परिणाम; पेट्रोलचा टॅंकर येणार नसल्याच्या भीतीने पंपावर तोबा गर्दी

केंद्र सरकारकडून नवा मोटार वाहन कायदा पारित केल्याने राज्यातील ट्रक चालकांनी मुंबईत आंदोलन केलं आहे. केंद्र सरकारने बदल केलेल्या कायद्याविरोधात ट्रक चालकांनी संप पुकारला आहे. अशातच आता ट्रक चालक संपावर असल्याने पेट्रोलचा टॅंकर शहरात येणार नसल्याची अफवा उडाली. या अफवेनंतर मुंबईतील नागरिकांची चांगलीच बांभळ उडाली आहे. मुंबईकरांनी शहरातील पेट्रोल पंप गाठून गाडीत फुल पेट्रोल भरण्यासाठी […]

Mumbai Petrol Pump

Mumbai Petrol Pump

केंद्र सरकारकडून नवा मोटार वाहन कायदा पारित केल्याने राज्यातील ट्रक चालकांनी मुंबईत आंदोलन केलं आहे. केंद्र सरकारने बदल केलेल्या कायद्याविरोधात ट्रक चालकांनी संप पुकारला आहे. अशातच आता ट्रक चालक संपावर असल्याने पेट्रोलचा टॅंकर शहरात येणार नसल्याची अफवा उडाली. या अफवेनंतर मुंबईतील नागरिकांची चांगलीच बांभळ उडाली आहे. मुंबईकरांनी शहरातील पेट्रोल पंप गाठून गाडीत फुल पेट्रोल भरण्यासाठी मोठ्या रांगाच लावल्याची परिस्थिती दिसून येत आहे.

राम मंदिर लोकार्पणदिनी सार्वजनिक सुट्टी जाहीर करा; भाजप आमदाराची मुख्यमंत्र्यांकडं मागणी

नुकताच केंद्र शासनाने नवीन मोटार वाहन कायदा आणला आहे. या नवीन कायद्यानुसार दहा वर्षाची शिक्षा व लाखो रुपये दंडांची तरतूद आहे. तसेच हा कायदा आता अजामीनपात्र असून या कठोर कायद्याविरोधात ट्रक चालकांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत आंदोलन पुकारले आहे.

KWK 8: उतावळी नवरी अन्…! लग्नाआधीचं जान्हवी कपूरनं माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाचं नाव घेतलं? म्हणाली…

नवी मुंबईतील JNPT मार्गावर ट्रक चालकांचं आंदोलन सुरु असतानाच भर रस्त्यावरच ट्रक आणि डंपर चालकांनी वाहने उभी केली होती. रस्त्याच्या मधोमध वाहने उभी केल्याने वाहतूक जाम झाली होती. वाहने रस्त्याच्या बाजूला घेण्याबाबत पोलिसांकडून आंदोलकांना सांगण्यात आलं होतं, मात्र आंदोलकांनी वाहने बाजूला घेण्यास विरोध केल्याचं पाहायला मिळालं.

खुशखबर! आता एमटीडीसी रिसॉर्टमध्येही महिलांना ५० टक्के सवलत, कधी पर्यंत घेता येणार लाभ?

याचदरम्यान, पोलिस आणि आंदोलकांमध्ये चांगलीच जुंपल्याचं दिसून आलं आहे. पोलिस-आंदोलकांमध्ये बाचाबाची सुरु असतानाच काही आंदोलकांनी अचानक दगड फेकण्यास सुरुवात केली. याचवेळी काही आंदोलकांनी हातात बांबू घेत पोलिसांच्या मागे लागल्याचं दिसून आलं आहे. यावेळी पोलिसांनी आंदोलनस्थळापासून पळ काढला असून या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

‘थर्टी फस्टला’ना दारू, ना मटन; नगरमधल्या ‘या’ गावाने आखला आमटी-भाकरीचा बेत

दरम्यान, ट्रकचालकांचा हा संप पुढील काही दिवस चालणार असल्याची शक्यता आहे त्यामुळे ट्रकचालकांच्या संपामुळे पेट्रोल मिळणार नाही, या भीतीने नागरिकांनी पेट्रोल भरण्यासाठी तोबा गर्दी केली आहे. या गर्दीमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत असल्याचं दिसून येत आहे.

Exit mobile version