Download App

Maratha Reservation : ‘जरांगे पाटील समजूतदार नेते, सरकारला वेळ द्या’; केसरकरांनी शब्द टाकला

Deepak Kesarkar on Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) काल लाखो समाजबांधवांना सोबत घेत मुंबईची वाट धरली. आज त्यांच्या पायी दिंडीचा दुसरा दिवस आहे. त्यांच्या या आंदोलनाची सरकारने चांगलाच धसका घेतला आहे. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) राज्य सरकार सकारात्मक आणि वेगाने कार्यवाही करत आहे. तेव्हा जरांगे पाटलांनी आंदोलन थांबवावं असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले होते. त्यानंतर आता शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनीही जरांगे पाटील यांना आवाहन केले आहे. मनोज जरांगे पाटील समजूतदार नेते आहेत. त्यांनी सरकाराला मुदत द्यावी, असे आवाहन मंत्री केसरकर यांनी केले.

मुंबईत आयोजित मॅरेथॉनवेळी केसरकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत प्रश्न विचारला. त्यावर केसरकर म्हणाले, त्यांची मूळची भूमिका मान्य झाली आहे. त्यांना वाटत होतं कुणबी दाखले मिळत नव्हते ते आता मिळत आहेत. महाराष्ट्रातले सर्वच प्रमाणपत्र तपासले गेले आहेत. सर्वांना अर्ज करावा लागतो त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळतं. याचं श्रेय देखील जरांगे यांनाच दिलं पाहिजे.

Deepak Kesarkar : ‘युती तुटण्यामागे आदित्य ठाकरेंचा वाटा’ शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा

मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. त्यामुळे मूळ मागणी मान्य झाली असताना आता त्यांनी योग्य विचार करावा. दुसऱ्या मागणीसाठी धीर धरावा. ते समजूतदार नेते आहेत. त्यांनी सरकारला मुदत द्यावी, सगळ्यांचा विचार त्यांनी करायला पाहिजे असे आवाहन केसरकर यांनी केले. त्यांच्या या आवाहनानंतर आता मनोज जरांगे पाटील काय प्रत्युत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दादागिरी करू नका, तोडगा काढा – मनोज जरांगे 

मराठा समाज मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होणार आहे. आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत. संविधान हातात घेऊ नये. यावर मार्ग कसा काढता येईल हे सरकारने पहावे. आमच्या नोंदी आता सापडल्या आहेत. आणखी दोन दिवस वाट पाहणार आहोत अन्यथा आमच्या गावात यायचं नाही. मुंबईत येऊ नका असे म्हणत दादागिरीची भाषा सरकारने करू नये. 26 जानेवारीच्या आधी तोडगा काढा (Maratha Reservation) अशा शब्दांत जरांगे पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

Manoj Jarange : ‘कारवाई करूनच दाखवा मग मराठे सुद्धा’; जरांगेंचं अजितदादांना सडेतोड उत्तर 

follow us