Download App

बदल्यांचा धडाका ! पुन्हा राज्यातील अठरा आएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

  • Written By: Last Updated:

IAS Officer Transfer : गेल्या आठवड्यात अनेक IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य सरकारने केल्या होत्या. आता पुन्हा शुक्रवारी अठरा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. यात सोनिया सेठी यांची महसूल आणि वनविभाग मंत्रालयाच्या पीआरपदावर नियुक्ती झाली आहे. तर नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त म्हणून रुपिंदर सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर अविनाश पाठक यांची बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झालेली आहे. ओबीसी बहुजन कल्याण पुणे विभागाचे संचालक म्हणून प्रवीणकुमार देवरे यांची बदली झाली आहे. (eighteen IAS officers in the state)

बदली झालेले अधिकारी व ठिकाण

1. सोनिया सेठी, IAS (1994) यांची PS (R&R), महसूल आणि वन विभाग, मंत्रालय

2. रुपिंदर सिंग, IAS (1996) यांची निवासी आयुक्त आणि PS, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली

.3. गोरक्ष गाडीलकर, IAS (2013) संचालक, रेशीम, नागपूर

4. प्रकाश बी.खपले, IAS (2013) महाडी, स्कॉम, औरंगाबाद येथे सह व्यवस्थापकीय संचालक

5. अविनाश पाठक, IAS (2013) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड

6. गुलाब आर.खरात, IAS (2013) शिवशाही पुनर्वास प्रकल्प, मुंबई

7. प्रविणकुमार देवरे, IAS (2013) संचालक OBC बहुजन कल्याण, पुणे

8. मिलिंदकुमार डब्लू.साळवे, IAS (2013) सहआयुक्त, राज्य कर, औरंगाबाद

9. सतीशकुमार डी. खडके, IAS (2014) नाशिक मेट्रो क्षेत्र विकास प्राधिकरण

10. संजय एस. काटकर, IAS (2014)-सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, नवी मुंबई

11. पराग एस. सोमण, IAS (2014)-मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई

12. अनिलकुमार के. पवार, IAS (2014) आयुक्त, वसई-विरार महानगरपालिका

13. सचिन बी. कालत्रे, IAS (2014)-व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला

14. मनोज व्ही. रानडे, IAS (2014) संचालक, महापालिका प्रशासन, मुंबई

15. नेहा भोसले- प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, ITDP, जव्हार, पालघर

16. मुरुगनंथम एम. (२०२०)-प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, ITDP, गडचिरोली

17. रिचर्ड यंथन (2020)- प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, ITDP, धारणी, अमरावती

18. कार्तिकेयन एस. (2020)-प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, ITDP, किनवट, नांदेड

Tags

follow us