भाजपने मुंबई महापालिकेच्या माध्यमातून जनतेच्या पैशांच्या लूट चालवली आहे. त्यामुळे जनतेच्या या पैशांचा हिशोब थेट महापालिकेतच जाऊन विचारणार आहे. यासाठी येत्या 1 जुलैला महापालिकेवर भव्य मोर्चा काढणार असल्याची घोषणा शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली आहे. त्यांच्या या घोषणेवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिले आहे.
दरोडे टाकणाऱ्यांनी चोरीची भाषा करणे हे त्यांच्या तोंडी शोभत नाही. गेल्या 15 ते 20 वर्ष ज्यांनी मुंबई महापालिकेवर दरोडा टाकला. हा सर्व हिशोब कॅग आता विचारणार आहे. या सर्व घोटाळ्याच्या तपासासाठी SIT ची घोषणा झालेली आहे. या एका निर्णयामुळे ठाकरेंच्या पायाखालील वाळू सरकलेली असल्याचे शिंदे म्हणाले. आजची ही घोषणा म्हणजे दिशाभूल करण्याचाच एक केविलवाणा प्रयत्न असल्याचे सांगत दूध का दूध पानी का पानी होईल असे शिंदे म्हणाले.
News Arena India Survey : नागपूरात केदार, राऊतांचे गड सुरक्षित पण शरद पवारांच्या शिलेदाराला धक्का
पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, ठाकरेंची आजची पत्रकार परिषद म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाटे असे म्हणत हमारा खुला किताब है|. SIT चौकशीत कुठलाही राजकीय हेतू ठेवून चौकशी होणार नाही. कॅगच्या ताशेऱ्यावर नि:पक्षपणे चौकशी केली जाईल असा दावाही शिंदेंनी यावेळी बोलताना केला आहे. मुंबईकरांचा पैसा मुंबईकरांच्याच तिजोरीत राहिला तो कुणालाही इकडेतिकडे वळवता येणार नाही. यासाठीच आजची ठाकरेंची केविलवाणी धडपड असल्याचे शिंदे म्हणाले.
इंदुरीकर महाराजांच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समिती आक्रमक
आदित्य ठाकरे करणार नेतृत्त्व
यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले, मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात, त्याला वाचा फोडण्यासाठी आणि जाब विचारण्यासाठी, येत्या 1 जुलैला शिवसेना महापालिकेवर विराट मोर्चा काढणार आहे. त्याचं नेतृत्व आदित्य करेल. शिवसेनेची सत्ता आल्यानंतर महापालिकेच्या तिजोरीमध्ये भर पडली आहे. ते पैसे पलिकेचे नव्हते. त्या ठेवी होत्या. त्यातून आम्ही विविध विकासकाम केली. त्यात कोस्टल रोड, जनतेची काम केली गेली. आता मात्र कोणत्याही कारणांसाठी हा जनतेची पैसै वापरला जात आहे. असा आरोप ठाकरे यांनी यावेळी भाजपवर केला.
https://www.youtube.com/watch?v=XoR4AZJHywI