Eknath Shinde On Uddhav Thackeray:महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केअर फंडातून निधी आणावा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तुम्ही कोविडमध्ये सहाशे कोटी रुपये जमा केले होते. त्यातील एक पैसा खर्च केला का ? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केलाय. त्यामुळे तुम्हाला पंतप्रधानांवर बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही, असे शिंदे म्हणाले.
मुंबईतील गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. त्यात शिंदे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
तीस वर्षात मुंबई ओरबडून खाल्ली, ही माया लंडनला गेली का कुठे गेली ? एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना घेरले !
एकनाथ शिंदे म्हणाले, ते मध्यंतरी म्हणाले, पीएम केअरमधून पैसे द्या म्हणाले. पीएम केअर योजना कोविडसाठी होती. एेवढे पण कळत नाही का ? तुम्ही कोविडमध्ये सहाशे कोटी रुपये जमा केले, एक पैसा खर्च केला का सांगा ? तुम्हाला पंतप्रधानांवर आरोप करण्याचा अधिकार काय आहे. (Eknath Shinde On Uddhav Thackeray You have deposited Rs 600 crore in Covid; what right do you have to speak on the Prime Minister?)
केंद्राने दहा हजार कोटी दिलेत
पंतप्रधानांनी शेतकरी सन्मान व आपत्तीमध्ये 46 हजार कोटी रुपये महाराष्ट्राला दिले आहे. शेतकरी सन्मान योजना केंद्राने सुरू केली आहे. राज्याने वर्षाला सहा हजार रुपये द्यायचे आहे. राज्य सरकारने तेरा हजार कोटी रुपये दिले आहे. केंद्राने ऊस उत्पादक संकटात होती. तेव्हा अमित शाहाने दहा हजार कोटी रुपये माफ केले आहे. गेल्या दहा वर्षांत मोदींनी दहा लाख कोटी रुपये महाराष्ट्राला दिले असल्याचे शिंदे म्हणाले.
विराट गर्दी ! भक्तीगड येथील दसरा मेळाव्यातील खास क्षण
वाढवण बंदर झाले आहे. अटल सेतू झाला आहे. याला केंद्राने मदत केली आहे. नवी मुंबईला विमानतळ, मेट्रो तीनचे उद्घाटन होत आहे. तुम्ही पंतप्रधानांवर टीका करताय आहे. जे दोन्ही हाताने देत आहे. त्यांच्यावर तुम्हा टीका करतात.
तुम्हीच पाकला हेडलाइन्स दिल्या
काही लोक म्हणाले तुमचा मेळावा सुरूतमध्ये करा. अमित शाहांना बोलवा. सुरत भारतामध्ये आहे. त्यांना बोलवायला आम्हाला काही वाटणार नाही. तुमचा मेळावा पाकिस्तानमध्ये करा आणि असिफ मुनीरला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवा. तुमच्या बातम्या पाकिस्तानमध्ये हेडलाइन झाल्या असत्या. त्यानंतर तुम्हाला आनंदाच्या उकळ्या फुटल्या असता. तुम्ही आपल्या लष्करावर, शौर्यावर अविश्वास दाखविला आहे. तुमच्या देशातील लोक संशय व्यक्त केला. तुम्हीच पाकिस्तानला हेडलाइन दिल्या. राहुल गांधी पाकिस्तानचा भाषा बोलू लागले आहे. तुम्ही त्यांच्या बाजूला बसतात. हे देशप्रेम नसून हे पाकिस्तान प्रेम असल्याचे शिंदे म्हणाले.
तुम्हाला आमच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही. सावरकरांवर टीका जे करतात, राहुल गांधी मुद्दाम करतात, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. हे हिंदुत्व आहे तुमचे आहे. पाकिस्तानचा झेंडा फोडता. बॉम्बस्फोटच्या आरोपींचे कबरी सजवतात. हिंदुत्वा काय टी शर्ट आहे का ? २०१९ हिंदूत्व काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधली आहे, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केलीय