एकनाथ शिंदेंचा दिवाळी ‘धमाका’ ! मुंबई पुण्यातून जोरदार इनकमिंग, अहिल्यानगरमध्ये भाजपलाच सुरुंग

Eknath Shinde: अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमधील कट्टर भाजप कार्यकर्ते प्रकाश चित्ते यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय.

Eknath Shinde shivsena joined from pune, nashik mumbai

Eknath Shinde shivsena joined from pune, nashik mumbai

Eknath Shinde: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरू आहे. रविवारी एकनाथ शिंदे यांनी इनकमिंगचा दिवाळी धमाका केला. राष्ट्रवादी (NCP), काँग्रेस, शिवसेने (उबाठा) सह भाजपचे (BJP) पदाधिकारी पक्षात घेतले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमधील कट्टर भाजप कार्यकर्ते प्रकाश चित्ते (Prasksh chitte) यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यामुळे भाजपला श्रीरामपूरमध्ये मोठा धक्का बसलाय.

मुंबईत उबाठाचे पदाधिकारी फोडले
मुंबईतील वाकोला प्रभाग क्रमांक 91चे उबाठा गटाचे माजी नगरसेवक सगुण नाईक त्यांची कन्या युवासेना कॉलेज कक्षप्रमुख, उबाठा गटाचे दहिसर येथील शाखाप्रमुख अक्षय राऊत, दहिसर विधानसभा चिटणीस नरेंद्र कडेचा, नमिता नाईक यांनी आपल्या असंख्य पदाधिकाऱ्यांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केलाय. मुंबईतील मानखुर्द येथील रणजित वर्मा ऊर्फ लालुभाई यांनीही शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह संकटमोचन हनुमान मंदिराचे अध्यक्ष राम पासवान, राजपाल राम, अशोक यादव, संजय राजभर, आणि मदिना मस्जिदचे खजिनदार मोहम्मद शफीक खान, हाजी अब्दुल अजीज, अब्दुल जब्बार सिद्दिकी यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय. (Eknath Shinde shivsena joined from pune, nashik mumbai)


नाशिकमधील माजी नगरसेवकही शिंदेसेनेत

नाशिक जिल्ह्यातील देवळाली प्रवरानगर परिषदेचे माजी नगरसेवक शिवाजीराव मुसमाडे, त्यांचे पुत्र प्रशांत मुसमाडे, काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष प्रमोद मुसमाडे, उबाठा गटाचे माजी नगरसेवक तुषार शेटे, माजी नगरसेवक अनिल शेंडगे, माजी उपनगराध्यक्ष अॅड. अजय पगारे यांनीही आज भगवा झेंडा हाती घेत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलाय.


मी 30 वर्षे मुंबईत जाऊन काय लाटा मोजल्या नाहीत; रामराजे निंबाळकर लवकरच मोठा निर्णय घेणार?


नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला झटका !

अहिल्यानगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव रेश्माताई माणिक जगताप, विद्या कांबळे, संगीता जगताप, रंजना जाधव, विशाखा दुर्गे, सविताताई पठारे यांनीही हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेत प्रवेश केलाय. तसेच अहिल्यानगरमधील श्रीरामपूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक प्रकाश चित्ते, माजी नगरसेवक किरण कुनिया, राजेंद्र कांबळे, सुदर्शन नागरी पतसंस्थेचे माजी चेअरमन शशिकांत कुडूसकर, किरण सोनवणे, संजय पांडे, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्रशांत हिवराळे आणि त्यांच्यासह २०० कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला.


बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा अन् आप नेते राघव चढ्ढा झाले आई बाबा; सोशल मीडियावर दिली माहिती

पुण्यातील पिंपरी चिंचवड येथील ताथवडे गावातील जीविका फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीकांत नवले, माजी सरपंच निरगुडी पुणे, हवेलीचे तालुका उपप्रमुख हनुमंत सुरवसे, उद्योजक राजीव वागजकर, हवेलीचे उबाठा विभागप्रमुख केतन गायकवाड, सुरेश गायकवाड, लंकेश दळवी, योगेश धोत्रे, सुशील खंडागळे आणि असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला.


श्रीरामपूरमध्ये शिंदेंचे ताकद वाढली

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीतील जुना चेहरा आणि प्रदेश ओबीसी सेलचे माजी उपाध्यक्ष प्रकाश चित्ते यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केलाय. श्रीरामपुरात प्रकाश चित्ते हे भाजपमधील हिंदुत्ववादी नेते म्हणून ओळखले जातात. शिंदे सेनेत आता नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी चित्ते, आणि बेग यांच्यामध्ये रस्सीखेच होणार आहे. तसेच माजी आमदार मुरकुटे हे देखील परिवारात नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे .यावेळी संपर्कप्रमुख जनार्दन गालपगार,संजय पांडे,राजेंद्र कांबळे,सुनिल मुथा आणि माजी नगरसेवक किरण लुनिया उपस्थित होते.

Exit mobile version