Eknath Shinde News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुंबई महापालिकेची निवडणूक सर्वात लक्षवेधी ठरणार आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडी आणि महायुतीने डावपेच टाकण्यास सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन अडीच तास चर्चा केली. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने दोन्ही भावांत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनीही याच निवडणुकीचा विचार करून पक्षाची मुख्य कार्यकारी समिती तयार केली. यात एकनाथ शिंदे यांच्यासह 21 जणांचा समावेश आहे.
आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाच्या (Maharashtra Local Body Elections) पातळीवरील निर्णय या समतीच्या माध्यमातून घेण्यात येणार आहेत. या समितीत पक्षातील प्रमुख नेते, खासदार, आमदार, माजी खासदार, माजी आमदारांचा समावेश आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (Mumbai News) पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने (Eknath Shinde) पक्षाची मुख्य कार्यकारी समिती तयार करण्यात आलेली आहे. यात पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 21 शिलेदारांचा समावेश करण्यात आला आहे. शिवसेनेची ही मुख्य कार्यकारी समिती पुढीलप्रमाणे असेल.
तुम्हाला बोलण्याचा नैतिक अधिकार नाही! एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंवर संतापले, मराठा आरक्षणावरून
शिवसेनेची मुख्य कार्यकारी समिती
१) एकनाथ शिंदे, मुख्य नेते
२) रामदास कदम, नेते
३) गजानन कीर्तीकर, नेते
४) आनंदराव अडसूळ, नेते
५) मीनाताई कांबळे, नेत्या
६) डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार
७) रवींद्र वायकर, खासदार
८) मिलिंद देवरा, राज्यसभा – खासदार
९) राहुल शेवाळे, माजी खासदार
१०) संजय निरुपम, माजी खासदार
११) प्रकाश सुर्वे, आमदार
१२) अशोक पाटील, आमदार
१३) मुरजी पटेल, आमदार
१४) दिलीप लांडे, आमदार
१५) तुकाराम काते, आमदार
१६) मंगेश कुडाळकर, आमदार
१७) श्रीमती मनिषा कायंदे, विधान परिषद, आमदार
१८) सदा सरवणकर, माजी आमदार
१९) यामिनी जाधव, माजी आमदार
२०) दीपक सावंत, माजी आमदार
२१) शिशिर शिंदे, माजी आमदार
जखमी बाईकस्वाराच्या मदतीला धावून जात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठरले विघ्नहर्ता