Eknath Shinde on Uddhav Thackeray : देशातील प्रमुख 15 विरोधी पक्षांची बैठक बिहारमधील पाटणा येथे झाली. त्या बैठकीला ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) देखील उपस्थित होते. यावरुन भाजप आणि शिंदे गटाकडून त्यांच्यावर टीका केली जातीय. ज्यांनी राम मंदिर, कलम 370 आणि बाळासाहेबांच्या विचारांना विरोध केला त्यांच्याबरोबर ‘दिलो का गठबंधन’. म्हणून आम्ही एक वर्षापूर्वी घेतलेला निर्णय योग्य होता, याची खातरजमा पाटण्याच्या बैठकीतून झाली आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली आहे.
यापूर्वी मुफ्ती सईद यांच्यासोबत भाजपने सरकार स्थापन केलं म्हणून उद्धव ठाकरे आरोप करत होते. आता काल काय केलं त्यांनी? मुफ्ती यांच्यासोबत बसले, चारा घोटाळ्यातील आरोपी लालू यादव यांच्यासोबत बसले आणि आता मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन करणार ? कोणत्या तोंडाने आंदोलन करणार? सगळ्या भ्रष्टाचारी लोकांसोबत ह्याचं साटलोट पाहायला मिळालं, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाच्या 1 जून रोजी होणाऱ्या आंदोलनावर केली आहे.
शंभर टक्के मंत्री म्हणून शपथ घेणार, आमदार संतोष बांगरांचा मंत्रीपदावर दावा, शिंदेंचं टेन्शन वाढलं
खरं म्हणजे देशाचे दुर्दैव आहे. 15 पक्ष एकत्र येतात. त्यांनी आत्मविश्वास गमावलेला आहे. त्यांच्या चेहऱ्यावर नैराश्य दिसत होतं. 15 लोकांनी मोदींच्या विरोधात एकत्र येणं हाच त्यांचा विजय आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या कितीही आघाड्यांनी एकत्र आले तरी काही होणार नाही. 2014 ला आघाड्या झाल्या होत्या, 2019 ला कितीतरी आरोप झाले होते. तरी देखील देशातील जनतेने विरोधी पक्षाला 40 पेक्षा जास्त खासदार निवडून दिले नाहीत. विरोधी पक्ष नेत्यांसाठी जेवढे खासदार लागतात तेवढे खासदार देखील निवडून आले नाहीत. हे देशाचं दुर्दैव आहे, असा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षांतील नेत्यांवर केला आहे.
विरोधीपक्षांच्या बैठकीवर एमआयएम नाराज; ओवेसी म्हणाले, आम्हाला दुर्लक्षित…
पंतप्रधान मोदी देशाची प्रतिमा जगभरात उंचवण्याचे काम करत आहेत. त्यांच्या पाठीमागे जनता आहे. अशा आघाड्या आपल्या परिवाराचा बचाव झाला पाहिजे यासाठी आहेत. त्यांना देशातील नागरिकांचे देणंघेणं नाही. स्वत:चा पक्ष कसा वाचेल, स्वार्थ कसा होईल, खुर्ची कशी वाचले, अशा केविलवाण्या प्रयत्नातून ही बैठक झाली आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाटण्यातील बैठकीवर केली आहे.