विरोधीपक्षांच्या बैठकीवर एमआयएम नाराज; ओवेसी म्हणाले, आम्हाला दुर्लक्षित…

विरोधीपक्षांच्या बैठकीवर एमआयएम नाराज; ओवेसी म्हणाले, आम्हाला दुर्लक्षित…

Asaduddin Owaisi on Opposition Parties Meetings : आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Elections)पार्श्वभूमीवर देशातील सर्व विरोधक मोदींना हरवण्यासाठी एकत्र आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar)यांनी सर्व विरोधी पक्षांची एक बैठक बोलवली होती. यामध्ये विरोधी पक्षांचे प्रमुख नेते सहभागी झाले होते. या बैठकीवरुन एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते आज छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar)आले होते, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या बैठकीवरुन नाराजी व्यक्त केली. (asaduddin-owaisi-on-bihar-opposition-parties-meetings-prime-minister-modis-visit-to-america)

खुंटीचं हिंदुत्व वेशीला टांगलं : पाटणा दौरा, मुफ्तींची भेट अन्…; CM शिंदेंनी सगळचं काढलं

असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, आमच्यावर विरोधकांचा विश्वास आहे की नाही माहित नाही, पण आम्हाला दुर्लक्षित केलं हे बरोबर नाही, असं म्हणत असदुद्दीन ओवेसी यांनी आपली नाराजी व्यक्त केली. त्याचवेळी मी स्वतःहून त्यांच्या बैठकीत जाणार नाही, भाजपाला हरवण्यासाठी अजेंडा गरजेचा आहे, असंही यावेळी असदुद्दीन ओवेसी म्हणाले.

‘उगाच तोंडाच्या वाफा दवडू नका, ते तुमचंच भूत’; फडणवीसांवर राऊतांचा पलटवार

छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी देखील विरोधकांच्या बैठकीला एमआयएमला न बोलवण्यावरुन नाराजी व्यक्त केली आहे. पाटन्याच्या बैठकीत एमआयएमला बोलवलं नाही. भाजपला हरवण्यासाठी एमआयएमला दुर्लक्षित करुन चालणार नाही. आम्हाला दुर्लक्षित करुन चालणार नाही, आम्हाला बोलवा आम्ही बैठकीला येऊ, असे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.

असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यावर जोरदार टीका केली आहे. त्याचवेळी ओवेसी म्हणाले की, आम्हालाही वाटतं भारत अमेरिकेचे संबंध चांगले व्हावेत. पण पंतप्रधान मोदींनी तिकडे परदेशात पत्रकारांशी संवाद न साधता दिल्लीत साधावा. भारतामध्ये अल्पसंख्यांकांवर अन्याय होत नाही असं त्या ठिकाणी सांगितलं पण मग मणिपूरमध्ये चर्च जाळली गेली त्याचं काय असा सवालही यावेळी ओवेसी यांनी केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube