Download App

Elvish Yadav : एल्विश यादव प्रकरणी ठाकरे गट आक्रमक; अंधारेंचा सीएम शिंदेंना थेट सवाल

Elvish Yadav : बिग बॉस ओटीटी 2 विजेता एल्विश यादववर (Elvish Yadav) रेव्ह पार्ट्या आयोजित करण्याबरोबरच नशेसाठी विषारी सापांचे विषाचा वापराबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचे राज्याच्या राजकारणात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. काँग्रेसनंतर आता ठाकरे गटही आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनीही ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर हल्लाबोल करत त्यांना सवाल विचारला आहे. एल्विश यादव मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर आरती का करत आहे, असा सवाल अंधारे यांनी केला आहे.

नुकताच देशासह राज्यात मोठ्या आंनंदात गणपती उत्सव साजरा करण्यात आला. या काळात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा निवास्थानी राजकीय नेत्यांसह अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यात प्रामुख्याने शहनाज गिल, रश्मी देसाई यांच्यासह बॉलिवूडमधील स्टार्सनी हजेरी लावली होती. यात ‘बिग बॉस OTT 2’ चा विजेता एल्विश यादवनेदेखील हजेरी लावत आरती करत शिंदेंच्या गणपतीचे आशीर्वाद घेतले होते. त्यानंतर आज एल्वीशवर दिल्लीतील नोयडामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, हीच संधी साधत अंधारे यांनी ट्विट करत एकनाथ शिंदेंना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

Elvish Yadav : .. तर मुक्काम थेट तुरुंगातच! काय आहे वन्यप्राण्यांच्या संरक्षणाचा कायदा?

अंधारेंचं ट्विट काय?

हा एल्विश यादव. विषारी सापांपासून बनवले जाणारे ड्रग्स रेव्ह पार्टीला पुरवण्याचे गुन्हे याच्यावर दाखल आहेत. ड्रग्सशी संबंधित अनेक आरोप एल्विशवर आहेत. पण हा नेमका मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर आरती का करत आहे?

 

Tags

follow us