Download App

संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ, ‘या’ प्रकरणी झाला गुन्हा दाखल

  • Written By: Last Updated:

मुंबई : मुख्यमंत्री सुपुत्र व खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला जीवे मारण्याची सुपारी दिल्याचा धक्कादायक आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. आता याच प्रकरणी राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राऊत यांच्या या तक्रारीनंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. मात्र आता थेट राऊतांवरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण आहे तरी काय?
शिवसेनेतील बंडानंतर ठाकरे गट व शिंदे गट निर्माण झाला आहे. यातच यामधील नेतेमंडई एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करत असतात. यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर आपल्याला जीवे मारण्याची सुपारी दिली असल्याचा आरोप केला होता. या संदर्भात राऊत यांनी पोलीस आयुक्तांसह मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनाही पत्र दिले होते.

तसेच यावेळी राऊत म्हणाले की, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आपली सुरक्षा काढून घेण्यात आली होती. त्यावेळीही मी सुरक्षा व्यवस्थेबाबत गृहमंत्र्यांना सांगितले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी कशी होणार याकडे साऱ्या राजकीय नेत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Earthquake : सीरिया-तुर्कीनंतर आता पूर्व ताजिकिस्तानमध्ये 7.3 रिश्टर स्केलचा भूकंप

शिंदे गट आक्रमक; राऊतांवर हल्लाबोल
संजय राऊत हे बेताल वक्तव्य करत असून त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रतिमा मलिन करण्याचे हेतूने संजय राऊत अशा प्रकारे आक्षेपार्ह विधान करीत असल्याचा आरोप यावेळी तक्रारदार शिवसेनेच्या ठाणे शहर महिला संघटक आणि शहराच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केला आहे.

IND W vs AUS W T20 : भारतासाठी आज ‘करो या मरो’ सामना

संजय राऊत यांनी समाजामध्ये व गटा-गटामध्ये द्वेषाची भावना तेढ व वैमनस्य निर्माण करण्याचे कृत्य केले. समाजातील शांतता भंग केली. अपमानित शब्द वापरे, तसेच खोटे पत्र पोलीस आयुक्त मुंबई व ठाणे यांना दिले, असे मिनाक्षी शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलंय.

Tags

follow us