Download App

Ashok Chavan : ठरलं तर! अशोक चव्हाणांसह आणखी एका आमदाराचा भाजपप्रवेश; आजचाच मुहूर्त

Ashok Chavan : राज्यात महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणुकांची जय्यत (Lok Sabha Election) तयारी केली जात असतानाच आघाडीला जोरदार दणका बसला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काल पक्षाला सोडचिठ्ठी दिली. निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या असताना हा राजकीय भूकंप झाल्याने आघाडी बॅकफूटवर ढकलली गेली आहे. काँग्रेस सोडल्यानंतर (Congress) पुढे काय करणार याचे उत्तर अशोक चव्हाण यांनी अजून दिलेले नाही. दरम्यान, अशोक चव्हाणांच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. निवडणुक अगदी जवळ आलेल्या असतानाच ही घडामोड घडल्याने आघाडीला आता नव्याने राजकीय गणितांची मांडणी करावी लागणार आहे.

सध्याची राजकीय परिस्थिती पाहता कदाचित आजच अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता व्यक्त होत आहे. फक्त अशोक चव्हाणच नाही तर त्यांच्याबरोबर अमर राजूरकर हे देखील भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. आज दुपारी 12 वाजता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि आमदार अमर राजूरकर भाजप कार्यालयात आयोजित कार्यक्रमात पक्ष प्रवेश करतील अशी माहिती मिळाली आहे. यावेळी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.

Ashok Chavhan यांच्या प्रवेशाबाबत फडणवीसांचे संकेत पण बावनकुळेंकडे प्रस्ताव नाही; गौडबंगाल काय?

राज्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काल मोठा राजकीय निर्णय घेतला. त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला. यानंतर त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची भेट घेऊन चर्चाही केली. या दोघात झालेल्या चर्चेची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. मात्र, या सगळ्या घडामोडी पाहता अशोक चव्हाण भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. येत्या दोन दिवसात भूमिका स्पष्ट करू असे अशोक चव्हाण काल म्हणाले होते. परंतु, आजच ते भाजपात प्रवेश करतील अशी माहिती समोर आली आहे.

काय म्हणाले फडणवीस ? 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाबाबतच्या चर्चांदरम्यान एक सूचक वक्तव्य केलं आहे. फडणवीस म्हणाले की,आज मी एवढेच म्हणेल की आगे आगे देखो होता है क्या. भारतीय जनता पक्ष सोबत वेगवेगळ्या पक्षांचे अनेक मोठे नेते येऊ इच्छित आहेत विशेषतः काँग्रेसचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत.

Ashok Chavan: अशोक चव्हाणांचा काँग्रेसला रामराम! पटोलेंना लिहिलेलं पत्र Letsupp च्या हाती!

follow us