मुंबई : नक्षलवादी संबंध प्रकरणात दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जीएन साईबाबांची (GN Saibaba) जन्मठेप रद्द करण्यात आली असून, साईबाबा यांच्यासह 5 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 2017 मध्ये सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज (दि.5) जीएन साईबाबा आणि इतर पाच जणांना निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायमूर्ती विनय जोशी आणि वाल्मिकी एसए मिनेझिस यांनी याप्रकरणी मोठा निर्णय दिला आहे. जीएन साईबाबा आणि त्यांच्या सहआरोपींना 2014 मध्ये नक्षलवादी गटांशी संबंध असल्याच्या आणि भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. (Bombay high court acquits former Delhi University professor GN Saibaba, 5 others in Maoist link case)
BREAKING| Bombay High Court Acquits GN Saibaba & 5 Others In Alleged Maoist Links Case, Sets Aside Life Sentence#BombayHighCourt #Saibaba https://t.co/tmxy99xfQ3
— Live Law (@LiveLawIndia) March 5, 2024
जी. एन. साईबाबा आणि त्यांच्या चार सहकाऱ्यांना गडचिरोली सत्र न्यायालयाने 7 मार्च 2017 रोजी नक्षलवादी कारवाईच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्याला आव्हान देणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. नागपूर खंडपीठात 7 सप्टेंबर 2023 रोजी या प्रकरणाची अंतिम सुनावणी होऊन निर्णय राखीव ठेवला होता. त्यावर नागपूर खंडपीठ आज मोठा निकाल देत साईबाबा यांच्यासह पाच जणांची निर्दोष मुक्तता केली आहे.
“खासदार होऊन तु्मच्यापासून दूर गेलो, दोन महिन्यांनंतर इकडेच येतो”; सुजय विखेंच्या मनात काय?
नेमकं प्रकरण काय?
दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक असलेले जी. एन. साईबाबा यांना 2013 मध्ये नक्षलवाद्यांच्या दक्षिण गडचिरोली कमांडर नर्मदा अक्काला भेटायला आलेल्या काही जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी साईबाबा यांच्या दिल्लीतील घरावर छापेमारी करत झडती घेतली होती. या सर्व प्रकरणात साईबाबा नक्षलवाद्यांशी संपर्कात असल्याचे पुरावेदेखील पोलिसांना आढळून आले होते. त्यानंतर साईबाबा यांना अटक करण्यात आली होती.
Maharashtra Politics : आज गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात; जागावाटपाचा तिढा सुटणार?
GN साईबाबा कोण आहेत?
साईबाबा यांचा जन्म आंध्र प्रदेशातील अमलापुरम येथे एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. पोलिओमुळे ते वयाच्या पाचव्या वर्षापासून व्हीलचेअरचा वापर करत आहे. GN साईबाबा यांना गोकरकोंडा नागा साईबाबा म्हणूनही ओळखले जाते. ते लेखक आणि मानवाधिकार कार्यकर्ते आहेत. त्यांनी दिल्ली विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणूनही काम केले आहे. एवढेच नव्हे तर, विविध सामाजिक आणि राजकीय चळवळींमध्ये त्यांनी काम केले आहे.