Chhattisgarh Naxal IED Attack : छत्तीसगडमधील (Chhattisgarh) नक्षलग्रस्त (Naxal)दंतेवाडा जिल्ह्यात आज (दि.26) नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 11 डीआरजी (जिल्हा राखीव रक्षक) जवान शहीद झाले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, नक्षलवाद्यांनी जिल्ह्यातील अरणपूर पोलीस ठाण्याच्या परिसरात भूसुरुंगाचा स्फोट (Landmine explosion)केला. त्यांनी सांगितले की, अरणपूर पोलीस स्टेशन (Police Station) परिसरात नक्षलवाद्यांच्या उपस्थितीच्या माहितीवरुन नक्षलविरोधी अभियानात दंतेवाडा येथून डीआरजी फोर्स पाठवण्यात आले आहे.
याआधीही देशभराक नक्षलवाद्यांनी अनेकदा हल्ले केले आहेत.
त्यामध्ये 6 एप्रिल 2010 रोजी दंतेवाडा, छत्तीसगड येथे नक्षलवादी हल्ला झाला होता. त्यामध्ये 76 जवान शहीद झाल्याची माहिती आहे.
25 मे 2013 या दिवशी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर झिरम खोऱ्यात हल्ला झाला होता, यामध्ये काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसह 30 हून अधिक लोक मारले गेले.
11 मार्च 2014 या दिवशी सुकमा जिल्ह्यातील तहकवाडा येथे नक्षलवादी हल्ला झाला होता, त्यात 15 जवान शहीद झाले होते.
12 एप्रिल 2014 या दिवशी छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यातील दरभा येथे नक्षलवादी हल्ल्यात 5 जवानांसह 14 जणांचा मृत्यू झाला होता.
11 मार्च 2017 या दिवशी सुकमाच्या दुर्गम भेज्जी भागात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 12 CRPF जवान शहीद झाले होते.
24 एप्रिल 2017 या दिवशी सुकमा येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) 25 जवान शहीद झाले होते.
21 मार्च 2020 या दिवशी सुकमा जिल्ह्यातील मिनपा येथे नक्षलवाद्यांचा जवानांवर हल्ला झाला होता, त्यामध्ये 17 जवान शहीद झाले होते.
23 मार्च 2021 रोजी छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात सैनिकांनी भरलेल्या बसवर हल्ला झाला होता, त्यामध्ये 5 जवान शहीद झाले होते.
त्याचबरोबर 4 एप्रिल 2021 रोजी छत्तीसगडमधील विजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर नक्षलवाद्यांचा हल्ला झाला होता, त्यात 22 जवान शहीद झाले होते.