‘Vedant Marathe Veer Daudale Saat’ च्या शूटिंगदरम्यान प्रसिद्ध अभिनेत्याला दुखापत; व्हिडिओ पोस्ट करत दिली माहिती

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 26T164221.417

Vedant Marathe Veer Daudale Saat: महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ (Vedant Marathe Veer Daudale Saat ) या आगामी सिनेमाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. या सिनेमात अनेक मातब्बर कलाकार चाहत्यांना दिसून येणार आहेत. तर त्यांच्यासोबतच काही जण अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dr Utkarsh Anand Shinde (@utkarshshindeofficial)


सध्या या सिनेमाची टीम खूप कष्ट करत आहे. आता या सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान एका लोकप्रिय कलाकाराला दुखापत झाल्याचे समोर आले आहे. या सिनेमात प्रवीण तरडे, सिद्धार्थ जाधव, हार्दिक जोशी, जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे, विशाल निकम असे मातब्बर कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेमध्ये चाहत्यांना दिसणार आहेत.

गेल्या काही दिवस ही संपूर्ण टीम या सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त असल्याचे दिसत आहे. या सिनेमासाठी सर्वजण खूप मेहनत घेत आहेत. या सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान उत्कर्ष शिंदेला मोठी दुखापत झाली असल्याचे त्याने स्वतः सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सांगितले आहे. उत्कर्ष हा नेहमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय राहून त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात असतो.

सुनील बर्वेच्या अमर फोटो स्टुडिओ नाटकानं घेतला अखेरचा निरोप

या सिनेमात उत्कर्ष सूर्याजी दांडकर यांची भूमिका साकारणार आहे. या सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान त्याच्या हाताचे एक बोट फ्रॅक्चर झाले आहे. याबरोबरच तळहातालाही दुखापत झाली आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक रील पोस्ट करत त्याच्या दुखापतीविषयी चाहत्यांना मोठी माहिती दिली आहे. या रीलमध्ये त्याचं फ्रॅक्चर झालेले बोट आणि तळहाताला झालेली जखम दिसत आहे.

हा व्हिडीओ पोस्ट करत त्याने सांगितले आहे की, “सोडून देणारे कधीच जिंकत नाहीत आणि जिंकणारे कधीच सोडत नाहीत. आता त्याचा हा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आला आहे, त्याचे चाहते त्याच्याविषयी काळजी व्यक्त करत आहेत. याबरोबरच अनेकांनी त्याची प्रेमाने विचारपूस करत त्याला काळजी घेण्याचा सल्ला देखील चाहत्यांनी दिला आहे.

Tags

follow us