POP Ganesha idols : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशमंडळांना पीओपीच्या नियमांबाबत मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्लॅस्टर ऑफ पॅरिसला पर्याय सुचवण्याबाबत गाईडलाईन अद्याप जाहीर झाली नसल्यानं मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना या वर्षी चार फूटांवरील गणेशमूर्ती पीओपीची वापरता येणार आहे. पण 4 फुटांखाली मूर्ती मात्र शाडूच्याच मातीची असणं बंधनकारक असणार आहे. मुंबई महापालिकेकडून मूर्तीकार आणि मूर्ती विक्रेत्यांसाठी एक खिडकी पद्धतीने ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
गणेशोत्सव काही दिवसांवर आला असताना पुन्हा एकदा पीओपीचा मुद्दा चर्चेला आला आहे. मागील वर्षी पीओपी मूर्तीवर घातलेली बंदी यंदाही कायम आहे. यातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने एक धोरण आखले आहे, अशी माहिती नागपूर खंडपीठात सरकारच्यावतीने देण्यात आली आहे.
ऐन पावसाळ्यात राजकारण तापणार; एका बाजूने शरद पवार तर दुसऱ्या बाजूने काँग्रेस उतरणार मैदानात
उच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेत नाही ही जनहित याचिका दाखल केली आहे. राज्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल विभागाच्या उप सचिवांनी उच्च न्यायालयात शपथपत्र सादर केले. त्यानुसार पीओपीच्या समस्येवर राज्याच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक नवीन समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती प्रदूषण करणारे घटक पीओपीतून हटवून त्याद्वारे मूर्ती तयार करणे शक्य आहे की नाही यााबाबतचा आपला अहवाल तीन महिन्यांत राज्य सरकारला सादर करणार आहे.
Rahul Gandhi : राहुल गांधींची ‘घर वापसी’; खासदारी मिळताच सरकारी घरही मिळालं
राज्य सरकारने ऑगस्ट 2022 मध्ये जारी केलेले तात्पुरते धोरण कायमस्वरुपी लागू करायचे की बदलायचे या मद्द्यांवरही ही समिती आपले मत मांडणार आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य सरकारने हे धोरण स्वीकारले. सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे व्हावेत, यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत, असंही शपथपत्रात म्हटलं आहे.