कथित कोविड घोटाळा ते बाप चोरला, किरण पावसकरांनी सगळंच काढलं…

कोरोना काळात लोकांचा जीव जात होता तेव्हा आदित्य ठाकरेंसह त्यांचे मित्र मुंबई लुटत होते, असा गंभीर आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी केला आहे. दरम्यान, कोविड घोटाळ्याप्रकरणी आदित्य ठाकरेंचे मित्र सुरज चव्हाण यांची कोरोना काळातल्या कथित घोट्याळ्याप्रकरणी ईडीकडून चौकशी करण्यात आली. त्यावर किरण पावसकरांनी थेट आरोप केले आहेत. दुधात भेसळ करणाऱ्यांनो खबरदार! ‘मोक्का’अंतर्गत कारवाईचा […]

Kiran Pawaskar Speak On Aaditya Thackeray

Kiran Pawaskar Speak On Aaditya Thackeray

कोरोना काळात लोकांचा जीव जात होता तेव्हा आदित्य ठाकरेंसह त्यांचे मित्र मुंबई लुटत होते, असा गंभीर आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी केला आहे. दरम्यान, कोविड घोटाळ्याप्रकरणी आदित्य ठाकरेंचे मित्र सुरज चव्हाण यांची कोरोना काळातल्या कथित घोट्याळ्याप्रकरणी ईडीकडून चौकशी करण्यात आली. त्यावर किरण पावसकरांनी थेट आरोप केले आहेत.

दुधात भेसळ करणाऱ्यांनो खबरदार! ‘मोक्का’अंतर्गत कारवाईचा दुग्धविकास मंत्र्यांचा इशारा

पावसकर म्हणाले, कोविड काळाचा गैरवापर करुन ठाकरे परिवाराने पैसे कमावले आहेत त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करा. महापालिका कोविड घोटाळ्याच्या चौकशीला विलंब झाला आहे. पहिल्या तीन महिन्यात कारवाई व्हायला हवी होती, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत संयम बाळगला असल्याचं ते म्हणाले आहेत.

होय, झाकीर नाईकने साडेचार कोटी दिले होते, विखे पाटलांनी इतिहास सांगत दिलं राऊतांना उत्तर

तसेच सध्या सुरु असलेली कारवाई मागीलवर्षी दाखल झालेल्या तक्रारीवरुन होत आहे. कोविड घोटाळ्यातील सूरज चव्हाण व इतरांच्या चौकशीचे धागेदोरे निश्चितपणे आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत पोहचणार आहेत. चव्हाण हा आदित्यची सावली बनून होता. त्यामुळे ईडीने अधिक जलद कारवाई करावी, अन्यथा माल कुठे तरी नेऊन ठेवतील, असंही ते म्हणाले आहेत.

दोषारोपपत्र मागे घेण्यासाठी पंकजा मुंडेंची खंडपीठात धाव, नेमकं प्रकरणं तरी काय?

आजच्या ईडीच्या धाडीत आदित्यचे निकटवर्तीय सुरज चव्हाणकडे 4 कोटीची रोकड मिळालीय. ही रक्कम व मालमत्ता केवळ शोरुममधील आहे, गोडाऊनमध्ये किती मिळेल याचा अंदाज लावा, सुरजचा सुत्रधार आदित्य ठाकरेंपर्यंत पोहचायला वेळ लागणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

‘मुंबईतच का, ठाणे आणि पुण्यातही चौकशी करा’; ईडीच्या कारवाईवर दानवेंचा संताप

रेमडेसिवीर एक इंजेक्शन हाफकिनमधून 665 रुपयांत मिळत असताना 1568 रुपये देऊन त्याची खरेदी केली गेली. कोरोना काळात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात केला गेला, असं असूनही अन्याय झाल्याची बोंब करायची, हा उबाठा गटाचा नीचपणा असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केलीय.

उध्दव ठाकरे म्हणतात माझा बाप चोरला, आदित्य म्हणतो माझे वडिल हरवले आहेत, तर भोंगा बोलतो माझे दोन बाप आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालावे व त्यांना मदत करावी असा सल्ला पावसकरांनी दिला आहे.

Exit mobile version