दोषारोपपत्र मागे घेण्यासाठी पंकजा मुंडेंची खंडपीठात धाव, नेमकं प्रकरणं तरी काय?

दोषारोपपत्र मागे घेण्यासाठी पंकजा मुंडेंची खंडपीठात धाव, नेमकं प्रकरणं तरी काय?

Pankaja Munde : कोरोना काळात प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केल्याबाबत दाखल केलेला गुन्हा आणि दोषारोपपत्र रद्द करावे, अशी विनंती करणारा फौजदारी अर्ज भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि जि. प सदस्या सविता गोल्हार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात (Aurangabad Bench) दाखल केला आहे. या अर्जाच्या अनुषंगाने न्या. आर. जी. अवचट आणि न्या. एस. ए. देशमुख यांनी राज्य सरकारसह प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. (Case against Pankaja Munde, run to bench to quash charge-sheet)

https://www.youtube.com/watch?v=BowCJPGZrSo

या प्रकरणी ६ आठवड्यांनंतर सुनावणी होणार आहे. दरम्यान, पाटोदा येथील न्यायालयात दाखल असलेल्या खटल्याच्या सुनावणीला विभागीय खंडपीठाने वरील दोघींनाही हजर राहण्यापासून सूट दिली आहे.

संत भगवानबाबा यांचे जन्मस्थळ असलेले सावरगाव घाट येथे कोरोनाच्या काळात 50 लोकांसह पारंपारिक दसरा मेळावा ऑनलाइन घेण्यासाठी आयोजकांनी 25 ऑक्टोबर 2020 रोजी परवानगी मागितली होती. त्यावेळी बीड जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू असल्याने पाटोदा तहसीलदारांनी केवळ 5 जणांच्या उपस्थितीतच मेळाव्यास परवानगी दिली होती. असं असतांना भाजप नेत्या पंकजा मुंडे, केंद्रीय मंत्री भागवत कराड, महादेव जानकर, आमदार मोनिका राजळे, आमदार मेघना बोर्डीकर, श्रीराम धोंडे, जि. प.च्या सदस्या सविता गोल्हार, मेळाव्याचे आयोजक संदेश सानप, सावरगाव घाटचे सरपंच रामचंद्र सानप यांच्यासह 40 ते 50 जणांनी प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केले.

IND vs PAK फुटबॉल: एकटा भारतीय प्रशिक्षक भिडला पाकिस्तानी खेळाडूंशी, व्हिडिओ व्हायरल 

तसेच कोरोनाच्या अटी व शर्तींचे उल्लंघन करून ५ हून अधिक लोकांना एकत्र करून दसरा मेळावा आयोजित केला. यामुळे लोकांच्या जीवितास धोका निर्माण करणारी व हयगय करणारी कृती केली, अशी तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली. त्यावरून पाटोदा तालुक्यातील अंमळनेर पोलिस ठाण्यात वरील व्यक्तींविरुद्ध भादंवि व आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच पाटोदा न्यायालयात आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. याचिकाकर्त्याच्या वतीने वकील विशाल चाटे यांनी काम पाहिले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube