Ganeshotsav 2025 : आजपासून गणेशोत्सवाला (Ganeshotsav) सुरुवात झाली असून सगळीकडे अगदी आनंदात आणि जल्लोषात बाप्पाचं आगमन होत आहे. लालबागचा राजा (Lal Bag Ganapati) ही मंडपात विराजमान झाला आहे. पहाटे 5 वाजता बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. लालबागच्या राजाच्या आगमनाने संपूर्ण शहरात आनंदाचे वातावरण पसरलं आहे. लाखो भक्त बाप्पाच्या दर्शनासाठी लालबागच्या मंडपात गर्दी करत आहेत.
मी गोळ्या खायला तयार, पण मागे हटणार नाही; मुंबईत आंदोलन करण्यावर जरांगे ठाम
लालबागच्या राजाची भव्य मूर्ती आज सकाळी 5:00 वाजता मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुदाम कांबळे यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करून विराजमान करण्यात आली. यावेळी मंत्रोच्चार आणि भक्तांच्या ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने वातावरण भारावलं होतं. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर मंडळाने वार्षिक अहवाल 2024 चे प्रकाशन केले. त्यानंतर सकाळी सहा वाजल्यापासून लालबाग राजाचे दर्शन भाविकांसाठी सुरु करण्यात आले आहे. लालगबागच्या राजाचं यंदाचं हे 92 वं वर्ष आहे.
लालबागच्या परिसरात ढोल-ताशांचा नाद आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले.
यंदा लालबागच्या राजाचा दरबार तिरुपती बालाजीच्या राजमुकुटाने सजवण्यात आला आहे. खास सुवर्ण गजानन महल साकारण्यात आला आहे. यंदा बाप्पांच्या मूर्तीची उंची तब्बल 50 फूट इतकी आहे.
आता आरपारची लढाई, संयम ढळू देऊ नका; मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन
ऑनलाईन दर्शनही घेता येणार
लालबागचा राजा हा नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. दरवर्षी कोट्यवधी भक्त येथे नवस फेडण्यासाठी आणि दर्शनासाठी येतात. मंडळाने यावर्षी ऑनलाइन दर्शनाची सुविधा देखील उपलब्ध करून दिली आहे. लालबागचा राजा मंडळाच्या अधिकृत यूट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर २४ तास थेट दर्शन उपलब्ध आहे.
लालबागचा राजा मंडळाची स्थापना 1934 मध्ये झाली असून, गेल्या 91 वर्षांपासून हे मंडळ सामाजिक आणि धार्मिक कार्यात अग्रेसर आहे. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात लोकमान्य तिलक यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या या मंडळाने सामाजिक एकतेचा संदेश दिला. आजही लालबागचा राजा भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे.