आता आरपारची लढाई, संयम ढळू देऊ नका; मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन

आता आरपारची लढाई, संयम ढळू देऊ नका; मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन

Manoj Jarange PC : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी मनोज जरांगेंच्या (Manoj Jarange) नेतृत्त्वाखाली अंतरवाली सराटी ते मुंबई (Mumbai) मोर्चा काढला जाणार आहे. आज सकाळी जरांगे 10 वाजता अंतरवाली सराटीवरुन निघतील. तत्पूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. आता आरपारची लढाई आहे, संयम ढळू देऊ नका, ही लढाई आपल्याला जिंकायचीच, असं ते म्हणाले.

मी गोळ्या खालया तयार, पण मागे हटणार नाही; मुंबईत आंदोलन करण्यावर जरांगे ठाम 

जरांगे म्हणाले, अशी लढाई जगाच्या पाठीवर झाली कधी नसेल. आपल्याला ही लढाई जिंकायचीच आहे. कितीही दिवस लागले तरी संघर्ष चालू ठेवायचा. आता थांबायचं नाही. शांततेत मुंबईकडे निघायचे. समाजाची मान खाली होईल असे एकानेही वागायचे नाही. आपल्याला भडकावण्याचा प्रयत्न केला जाईल. पण आपण शांत डोक्याने जायचं. आता आरपारची शेवटची लढाई लढायची अन् ही लढाई जिंकायची आहे, असं जरांगे म्हणाले.

यावेळी बोलताना जरांगेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, काही लोकांकडून राजकारण करण्यासाठी खऱ्या हिंदू लोकांना अडवलं जातंय. आपल्याला विनाकारण त्रास दिला जातोय. सरकार चूक झाकण्यासाठी देव-देवतांना पुढं करतयं. देव-देवताच्या नावांखाली आपली, अडवणूक केली जात आहे. आम्हीही हिंदू आहोत, आम्ही सर्व देवांची पूजा करतो. पण हिंदू देवांच्या नावाखाली आमचीच अडवणूक का? आज ज्यांना हिंदुत्त्वाशी देणंघेणं नाही, धर्माशी देणंघेणं नाही,ज्यांना फक्त राजकारणासाठी हिंदुत्त्व लागतं, ते खोटे हिंदू लोक हिंदू धर्म चालवणाऱ्यांनाही अडवत आहेत. मग खरं हिंदू विरोधी कोण आहे? याचे उत्तर मोदी शाह यांनी द्यावे, असं ते म्हणाले.

आता आरपारची लढाई, संयम ढळू देऊ नका; मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन 

आरक्षण द्यायला सरकारच्या जीवावर आलं…
पुढं जरांगे म्हणाले, सरकारला सणाच्या काळात अशांतता निर्माण करायची आहे. मुख्यमंत्र्यांकडून जाणूनबाजून आम्ही शांततेत येत असताना आम्हाला त्रास का दिला जातोय? तुम्ही यासाठी त्यांना बसवले आहे का? असा सवाल जरांगेंनी मोदींना केला.

नवा कायदा आणून सरकार अडवणूक करत आहे. कालच त्यांनी याचिका दाखल केली आणि कालच निकालही आला. परवानगी नाकारली. परवानगी नाकारायला, आम्ही काय दंगली करायला निघालोय का? सरकारने परवानगी नाकारली म्हणजे आरक्षण देणं त्यांच्या जीवावर आलं, असा हल्लाबोलही जरांगेंनी केला.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube