Download App

छोटा राजनचा हस्तक गँगस्टर प्रसाद पुजारीचे अखेर चीनकडून प्रत्यार्पण, मुंबई पोलिसांना मोठे यश

  • Written By: Last Updated:

Prasad Pujari  Arrested : गेल्या अनेक वर्षांपासून गँगस्टर प्रसाद पुजारीला (Prasad Pujari) मुंबईत आणण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर प्रसाद पुजारीला मुंबई गुन्हे शाखेच्या (Mumbai Crime Branch) अधिकाऱ्यांनी चीनमधून अटक केली आहे. चीन (China) सरकारने प्रसाद पुजारीच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिल्यानंतर त्याला मुंबईत आणण्यात आले. तो गेल्या काही वर्षांपासून फरार होता. मोस्ट वॉंडेट व्यक्तीला चीनमधून भारतात आणण्याची ही पहिलाची घटना आहे. या घटनेमुळे मुंबई गुन्हे शाखेला मोठं यश मिळालं.

Manoj Jarange : मला अटक करुनच दाखवा, मनोज जरांगेंचं सरकारला ओपन चॅलेंज 

प्रसाद पुजारी 20 वर्षांपासून फरार
मुंबईत एकेकाळी त्याची मोठी दहशत होती. गुन्हेगारी हाच त्याने आपला व्यवसाय बनवला होता. प्रसाद पुजारी याच्यावर खून, धमकावणे आणि खंडणी असे अऩेक प्रकारेच गंभीर गुन्हे दाखल आहेत. 2020 मध्ये त्याच्यावर शेवटचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रसाद पुजारी हा 2008 पासून चीनमधील एका शहरात वास्तव्याला होता. त्याची चीनमधील वास्तव्याची मुदत मार्च २०१२ मध्ये संपली होती. मात्र, त्यानंतरही तो चीनमध्येच राहिला. चीनमध्ये राहूनही तो देशविघातक कारवायांमध्ये सामील होता. त्यामुळं इंटरपोलने त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती.

बाबा सिद्दीकीच्या एका शब्दावर अख्खं बॉलिवूड हजर होतं? 2024 मध्ये इफ्तारीत होणार ‘या’ खास गोष्टी 

गॅंगस्टर प्रसाद पुजारी याच्यावर अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. आणि याच या गुन्ह्यांमधून स्वत:चा बचाव करण्यासाठी तो चीनमध्ये पळून गेला होता. चिनमध्ये गेल्यावर तिथे त्याने एका तरुणीशी लग्न केले. प्रसाद पुजारी हा टुरिस्ट व्हिसावर चीनला गेला होता. दरम्यान, केंद्र सरकारने मोस्ट वाँटेड आरोपींची यादी तयार करून त्यांना भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू केली होती. याच मोहिमे अंतर्गत प्रसाद पुजारी याला चीनमधून मुंबईत आणण्यात आले आहे.

शिवसेना नेत्यावर गोळीबार करण्यात पुजारीचा हात
19 डिसेंबर 2019 रोजी मुंबईतील विक्रोळी भागात राहणारे शिवसेना नेते चंद्रकांत जाधव यांच्यावर गोळीबार झाला होताय. या गोळीबारात सुदैवाने चंद्रकांत जाधव थोडक्यात बचावले होते. या गोळीबार प्रकरणात प्रसाद पुजारीचे नाव पुढे आले होते. दरम्यान, प्रसाद पुजारी यांना अखेर 20 वर्षांनी मुंबईत आणण्यात आले आहे.

follow us

वेब स्टोरीज