Download App

पवार अन् शिंदेंची भेट होताच गौतम अदानी ‘सिल्व्हर ओक’वर दाखल

उद्योजक गौतम अदानी शरद पवारांच्या भेटीसाठी पवारांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक निवासस्थानी दाखल झाले आहे. काही वेळापूर्वीच शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता गौतम अदानी पवारांच्या भेटीसाठी दाखल झाल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. याबाबतचे वृत्त  एबीपी माझा या वृत्त वाहिणीने दिले आहे.

काही वेळापूर्वीच शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर लगेचच गौतम अदानी हे शरद पवारांना भेटायला त्यांचा घरी दाखल झाले. त्यामुळे या भेटीकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहिले जात आहे.

पवार अन् शिंदेंची भेट होताच गौतम अदानी ‘सिल्व्हर ओक’वर दाखल

शरद पवार आणि गौतम अदानी यांचे संबंध किती चांगले आहे, हे सगळ्यांनाच माहित आहे. पवार यांचे आत्मचरित्र असलेल्या लोक माझे सांगाती यामध्ये पवारांनी अदानी यांचे कौतुक केले आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस व विरोधीपक्षांकडून अदानी हिंडेनबर्ग रिपोर्टच्या आरोपांवरुन जेपीसीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली होती.

राष्ट्रवादीतूनचं शड्डू पडल्यानंतर कोल्हेंच्या लांडेंना शुभेच्छा; म्हणाले, शर्यत अजून….

मात्र, शरद पवारांनी यावेळी आपली वेगळी भूमिका घेतली होती. जेपीसीकडून काहीही होणार नाही, असे ते म्हणाले होते. त्यामुळे विरोधी पक्षामध्येच एकमत नसल्याचे बोलले जात होते. या अगोदर २० एप्रिल रोजी गौतम अदानी व शरद पवार यांच भेट झाली होती. त्यावेळी सिल्व्हर ओकवर बंद दाराआड २ तास चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यावेळी भेटीमध्ये काय चर्चा झाली याबाबत कोणतिही माहिती समोली आली नाही. तसेच आजही या भेटीत काय चर्चा झाली ते देखील समोर आलेले नाही.

 

 

सविस्तर वृत्त थोड्याचवेळात…

Tags

follow us